Jayant Patil : ‘चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावा’; जयंत पाटील यांची ईडीकडे मागणी

जयंत पाटील यांना सोमवार १५ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

178
Jayant Patil
Jayant Patil : 'चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावा'; जयंती पाटील यांची ईडीकडे मागणी

मागील काही महिन्यांपासून देशातील अनेक बड्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्याला ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आली आहे. जयंत पाटील यांना सोमवार १५ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता.

(हेही वाचा – Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस)

मात्र जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चौकशीसाठी अधिक वेळ मागून घेतला आहे. जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावे या बाबतचे पत्र जयंत पाटील यांनी ईडीला लिहले आहे.

हेही पहा – 

ईडीच्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ज्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.