एसटीच्या संपकरी कामगारांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सध्या त्या फरार आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना संरक्षण पुरवले आहे, परंतु सध्या त्या फरार असल्यामुळे त्यांचे संरक्षण करायचे कसे, असा प्रश्न मुंबई पोलिसांना पडला आहे.
13 एप्रिल रोजी एफआयआरमध्ये नाव
जयश्री पाटील या मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत. अॅड. पाटील यांचे पती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयात गेल्या, तेव्हा त्या पोलीस संरक्षणाशिवाय होत्या. आपले संरक्षण सुरक्षित नाही, अशी शंका आल्याने त्या पोलिसांना टाळू लागल्या. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गावदेवी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना वॉण्टेड दाखवण्यात आले आहे. जयश्री पाटील यांनीच हे आंदोलन करण्यास सांगितले, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली. गावदेवी पोलिसांनी बुधवारी, 13 एप्रिल रोजी एफआयआरमध्ये त्यांचे नाव आरोपी म्हणून जोडले. त्यानंतर जयश्री पाटील यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून त्या नॉटरिचेबल आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथक रवाना करण्यात आली आहेत.
(हेही वाचा राष्ट्रवादीची हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी, मुसलमान प्रसाद खाऊन सोडणार रोजा)
Join Our WhatsApp Community