मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधणे शिवसेनेचे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना चांगले भोवले आहे. जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकलपट्टी केल्याची घोषणा बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली आहे. या घोषणेमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
का केली हकालपट्टी?
बीड शहरातील सिमेंट रस्ता व नालीच्या 70 कोटींच्या विकास कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आले होते. जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे आज जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर यांच्यावर कारवाईची घोषणा केली. जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना जयदत्त क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. मुंबईत जाऊन त्यांची कधी भेट घेतली नाही. नुकत्याच केलेल्या उद्घाटनात कुठेही त्यांचा उल्लेख केला नाही. ही खंत वाटल्यामुळे यापुढे त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली.
(हेही वाचा हिंदूंच्या धर्मांतरासाठी ॲमेझॉन पुरवते पैसा? राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची नोटीस)
Join Our WhatsApp Community