Jharkhand Assembly Election: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; अनेक दिग्गज नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला

69
Jharkhand Assembly Election: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; अनेक दिग्गज नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला
Jharkhand Assembly Election: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; अनेक दिग्गज नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Jharkhand Assembly Election) दोन टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. त्यानुसार, आज (13 नोव्हें.) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या 81 जागांपैकी पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी मतदान घेतले जात आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) यांच्या अनेक दिग्गज नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिल्या टप्प्यात 683 उमेदवार निवडणुकच्या रिंगणात आहेत. (Jharkhand Assembly Election)

(हेही वाचा-Assembly Election साठी एसटीच्या ९ हजार बस तैनात)

झारखंडमधील (Jharkhand Assembly Election) विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. त्यानुसार, आता मतदान घेतले जात आहे. पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी 15344 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. राज्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे. मात्र, 950 बूथ आहेत जिथे मतदानाची वेळ फक्त 4 वाजेपर्यंत असेल.

(हेही वाचा-CISF ची पहिली महिला बटालियन लवकरच स्थापन होणार; गृह मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय)

मतदान प्रक्रियेतील पथकाला हवाई मार्गाने संवेदनशील भागात पाठवण्यात आले आहे. राज्यात सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 73 महिला उमेदवारांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या 43 जागांपैकी 17 सर्वसाधारण, तर 20 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि 6 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. (Jharkhand Assembly Election)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.