झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट बंद (Jharkhand Congress X Account Withheld ) करण्यात आलेलं आहे. एएनआयच्या माहितीनुसार, याच हँडलवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा डीपफेक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड (Jharkhand Congress X Account Withheld ) करण्यात आलं आहे. यापूर्वीच झारखंड काँग्रेसचे अधयक्ष राजेश ठाकूर (Rajesh Thakur) यांना बनावट व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या वतीने २८ एप्रिल रोजी याप्रकरणी एक प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे. (Jharkhand Congress X Account Withheld )
(हेही वाचा –Madha Lok sabha Election: शरद पवारांना धक्का! अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा जाहीर)
राजेश ठाकूर यांना दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. या प्रकरणी बोलताना झारखंड काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हटलं की, ”दिल्ली पोलिसांकडून मला मंगळवारी नोटीस मिळाली. परंतु हे मला कळत नाहीये की मला नोटीस का पाठवली. हे अराजकतेशिवाय दुसरं काय आहे. जर त्यांना काही अडचण असती तर त्यांनी सुरुवातीला माझ्या एक्स अकाऊंटवरील खात्याची पडताळणी करायला हवी होती. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मी प्रचारात व्यस्त असताना त्यांनी मला माझ्याकडे माझा लॅपटॉप आणि इतर सामान मागवलं आहे. माहितीची खात्री केल्याशिवाय समन्स पाठवणं योग्य नाही.” असं ठाकूर म्हणाले. (Jharkhand Congress X Account Withheld )
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना नोटीस
याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्यासह सात राज्यातील १६ नोत्यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणात राजस्थान, झारखंड, नागालँड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशात तपास सुरु केला आहे. (Jharkhand Congress X Account Withheld )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community