झारखंडमध्ये Jharkhand Mukti Morcha पुन्हा सत्तेत, एनडीए आघाडीला २४ जागांवर विजय

52
झारखंडमध्ये Jharkhand Mukti Morcha पुन्हा सत्तेत, एनडीए आघाडीला २४ जागांवर विजय
झारखंडमध्ये Jharkhand Mukti Morcha पुन्हा सत्तेत, एनडीए आघाडीला २४ जागांवर विजय

झारखंड विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल स्पष्ट झाले आहेत. यावेळी झारखंड विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडीने चांगली कामगिरी आहे. इंडी आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चा (Jharkhand Mukti Morcha)ने ३४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १६ जागा तर आरजेडीने ४ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) (लिबरेशन) – सीपीआय (एमएल) (एल) (Communist Party of India (Marxist–Leninist) Liberation) ने प्रत्येक १ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये इंडी आघाडीने राज्यातील ८१ पैकी ५६ जागा जिंकल्या आहेत. (Jharkhand Mukti Morcha)

हेही वाचा : Uttar Pradesh मधील पोटनिवडणुकीत विधानसभेच्या नऊ पैकी सात जागा BJP ने जिंकल्या)  

दुसरीकडे झारखंड निवडणुकीत एनडीए (NDA) आघाडीला फटका बसला आहे. NDA साठी, भाजपने २१ जागा जिंकल्या आहेत, AJSU, JDU आणि LJP रामविलास यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. झारखंड निवडणुकीत एनडीएला एकूण २४ जागा मिळाल्या आहेत. आता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुढील सरकार कोणत्या दिवशी स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी एकंदरीत महायुतीला महाराष्ट्रात अभुतपूर्व यश मिळालेलं असताना दुसरीकडे एनडीएला मोठा फटका बसला आहे. (Jharkhand Mukti Morcha)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.