झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि समर्थक (Jharkhand political crisis) आमदारांना २ चार्टर्ड विमानांनी हैदराबादला पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. परंतु, बिरसामुंडा विमानतळावर दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली. पर्यायाने दोन्ही विमाने उड्डाण करू शकली नाहीत. त्यामुळे या आमदारांना पुन्हा रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये परत आणण्यात आले आहे.
(हेही वाचा – युवा पुरस्कार विजेता गुजराती भाषेतील प्रसिद्ध लेखक Raam Mori)
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand political crisis) यांना बुधवारी (३१ जानेवारी) अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. मात्र, त्यापूर्वीच सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सत्ताधारी जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीने ज्येष्ठ नेते चंपई सोरेन यांच्या नावाचा नवीन राज्यप्रमुख म्हणून प्रस्ताव मांडला. चंपाई सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली, परंतु राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले नाही.
(हेही वाचा – Naxalist : एकट्या गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शासकीय आणि खासगी मालमत्तांचे किती नुकसान केले? जाणून घ्या आकडा)
हेमंत सोरेनच्या ईडीच्या कोठडीवर शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झामुमो व इतर समर्थक आमदार फुटू नयेत म्हणून गुरुवारी रात्री झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि समर्थक (Jharkhand political crisis) आमदारांना २ चार्टर्ड विमानांनी हैदराबादला पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, खराब हवामानामुळे दोन विमानांतून प्रवास करणाऱ्या आमदारांना विमानतळावरून बसने सर्किट-हाऊसला परतावे लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community