आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र; Bangladesh मधील मान्यवरांनी सांगितले वास्तव

127
आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र; Bangladesh मधील मान्यवरांनी सांगितले वास्तव

बांगलादेशातील (Bangladesh) विद्यार्थ्यांचे आंदोलन हे बांगलादेशाच्या पंतप्रधान आणि तेथील सर्व हिंदूंना देशातून पळवून लावण्यासाठी रचलेले पूर्वनियोजित जिहादी षड्यंत्र आहे. हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आय्.एस्.आय्.’, चीन आणि अमेरिका यांचा हात आहे. बांगलादेशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही भारतीय शासनाला बांगलादेशातील हिंदूना तातडीने वाचवण्याची विनंती करतो, असे ढाका, बांगलादेश येथील ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन बांगलादेश आणि युरोपियन युनियन चॅप्टर’चे प्रधान सचिव दीपेन मित्रा यांनी म्हटले आहे. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष संवादातील ‘पुन्हा एकदा बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार ?’ या विषयावर ते बोलत होते.

(हेही वाचा – चूक झाली, माफ करा; नाशिकच्या सभेत Ajit Pawar यांनी दिली कबुली)

या वेळी दीपेन मित्रा पुढे म्हणाले की, आज बांगलादेशात २.५ कोटी हिंदू आहेत; मात्र हिंदू सुरक्षित नाहीत. हिंदूंना कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही. बांगलादेशी सरकार, नेते अथवा सैन्य यांच्याकडून हिंदूंना कोणत्याही प्रकारचे साहाय्य मदत मिळत नाही. अन्य घटनांमध्ये मानवतेवर अत्याचार होतात म्हणून संयुक्त राष्ट्र संघ, मानवाधिकार संघटना कितीतरी आरडाओरडा करतात? पण इथे बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूवर अत्याचार होतात तेव्हा हिंदूंसाठी कोणीच काही बोलत नाही; कारण त्यांच्यासाठी हिंदू ही माणसे नाहीत. त्यामुळे आम्ही भारतीय शासनाला बांगलादेशातील हिंदूना तातडीने वाचवण्यासाठी विनंती करतो.

(हेही वाचा – महाराष्ट्रातील जनतेने उबाठाची लाचारी बघितली; Shrikant Shinde यांची घणाघाती टीका)

बांगलादेशातील हिंदूंना वाचवायचे असेल, तर भारताने ठोस आक्रमक भूमिका घ्यावी !

‘पश्चिम बंगेर जन्य’चे संस्थापक सचिव प्रकाश दास म्हणाले की, वर्ष १९७२ मध्ये ज्या इस्कॉन मंदिराने बांगलादेशातील लोकांना सहा महिने भोजन दिले. त्याच लोकांनी या आंदोलनात ते इस्कॉन मंदिर जाळले. वर्ष १९७१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या वेळी २५ लाख हिंदू मारले गेले आणि हजारो स्त्रियांवर अत्याचार झाले. आज तोच प्रकार सुरू आहेत. विद्यार्थी आंदोलन हा मुखवटा आहे. खरे तर या आंदोलनाच्या आडून हे जिहाद्यांचेच षड्यंत्र आहे. बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळण्यासाठी भारताने आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे. इस्रायल जसा स्वत:चा देश आणि धर्म यांच्यासाठी लढतोय तसेच आपणही स्वरक्षणासाठी हाती शस्त्र घेणे आवश्यक आहे. भारताला बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूंना वाचवायचे असेल, तर ठोस आक्रमक पाऊल उचलावे लागेल. ‘जग काय म्हणेल?’ हा विचार सोडून ठोस कृती करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.