जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेले आरोप आणि अटक हे सुडाचे राजकारण आहे असे शिउबाठाचे नेते अरविंद सावंत यांना वाटते. आश्चर्याची गोष्ट अशी की सध्या महाविकास आघाडीतील लोक एकजूट होऊन लढत आहेत. विशेषतः ठाकरे गट या पुरोगाम्यांमध्ये आपल्याला मान मिळेल आणि आपणही एक महत्त्वाचे घटक होऊ यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आघाडीतल्या इतर पक्षातील नेत्यांना वाचवायला किंवा त्यांची बाजू मांडायला ठाकरे गटातील नेते पुढे सरसावतात.
सुडाचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या काळात सुरु
त्याचप्रमाणे अरविंद सावंत पुढे आले आहेत. सावंतांना हे सुडाचं राजकारण वाटतंय. परंतु सावंत यांनी आपल्या घरातलं कॅलेंडर पाहिलं पाहिजे आणि काही महिने मागे गेलं पाहिजे. जेणेकरुन त्यांच्या लक्षात येईल की सुडाचे राजकारण ही संकल्पना कुणी राबवली. ज्यावेळी कंगना राणावतचं घर तोडलं होतं किंवा तिला पत्रकरांसमोर शिवी घातली होती, त्यास सुडाचे राजकारण म्हणत नाही का? किरीट सोमैया यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यास सुडाचे राजकारण म्हणत नाही का? अर्णब गोस्वामी यांना अतिरेक्याप्रमाणे ट्रिटमेंट दिली, त्यास सुडाचे राजकारण म्हणत नाही का? अनंत करमुसे, केतकी चितळे अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अरविंद सावंत जे म्हणत आहेत त्यास चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात. सुडाचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या काळात सुरु झालं. ते मुख्यमंत्री असताना गुंडगिरी वाढली, पोलिसी यंत्रणेचा गैरवापर केला गेला. विरोधकांना मारहाण झाली.
(हेही वाचा राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांची पोलिसांत तक्रार, केली अटकेची मागणी)
जितेंद्र आव्हाड गुंड प्रवृत्तीचे नेते
एखाद्या चित्रपटात व्हिलन ज्याप्रमाणे वागतो आणि सामान्य जनांना त्रास देतो अगदी तशी कारकीर्द उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडी यांची झाली आणि जितेंद्र आव्हाड हे विनय नसलेले, लोकशाहीला काळीमा फासणारे व शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव वापरुन अफझलखानाचा वारसा चालवणारे गुंड प्रवृत्तीचे नेते आहेत. त्यांनी अनेकांना त्रास दिला. आता आव्हाडांची मुलगी म्हणते की त्यांचं कुटुंब तणावात आहे. पण त्या मुलीला कुणीतरी अनंत करमुसे यांच्या घरचा पत्ता दिला पाहिजे आणि तिने त्यांच्या लहान मुलींची भेट घेतली पाहिजे. जेणेकरुन आव्हाडांच्या सुपुत्रीला कळेल की तणाव काय असतो. आपले पुज्य पिताश्री समाजात ज्या वाईट प्रकारे वावरतात, त्याने कसा तणाव आणि भितीचं वातावरण निर्माण होतं, हे या लेकीने एकदा पाहिलंच पाहिजे. थोडक्यात, आघाडीचे नेते हेच सूडाच्या राजकारणाचे प्रणेते आहेत. म्हणून त्यांना इतरांवर असले आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही.
Join Our WhatsApp Community