राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रतेाद पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षनेतेपदही त्यांना देण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना शराद पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी दिल्याचे जाहीर केले आहे. तर मला पक्षाच्या चिन्हाचे काही नाही, मी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक जिंकल्याचे सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले की, संघर्षाची भूमिका घेतली, त्यांच्यात सहभागी झालो. तेव्हा कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे पक्षसंघटना बांधणी करणे हे गरजेचे आहे. पक्षाचे प्रमुख नेते बसतील, या घटनेवर निर्णय घेतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, काहींवर जबाबदारी टाकली आहे. जनरल सेक्रेटरी म्हणून तटकरे यांची नेमणूक मी केली आहे. स्पष्ट त्यांना सांगणे आहे. त्यांनी पक्षाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी पावले टाकले नाही. पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही.
(हेही वाचा Ajit Pawar : जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, मग भाजपसोबतही जाऊ शकतो; काय म्हणाले अजित पवार?)
चौकटीबाहेर गेले तर कारवाई होईल
शरद पवार म्हणाले की, पक्षाच्या चौकटीच्या बाहेर ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. माझे कोणाशीही बोललो नाही, विधानसभेत सदस्य त्यांच्यातील काही लोकांनी मला फोन केला. जाण्यापूर्वी भुजबळ मला भेटून गेले, तेव्हा त्यांनी शपथ घेतली हे कळाले. गुगली अजिबात नाही, दरोडा आहे, पक्षाच्या काही लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यातील कार्यकर्त्यांना मुक्तता करण्याचे काम केले.
पटेल, तटकरेंना पदावर राहण्याचा अधिकार नाही
ज्यांना जायचे नाही ते थांबले नाही. आमच्या पक्षाची नवीन टीम तुम्हाला दिसेल. शपथविधीनंतर मला कोणाचाही फोन आला नाही. त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आता नवीन कतृत्वाची पिढी उभी करू शकतो असे मत शरद पवारांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community