राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांना सतत अज्ञात व्यक्तींकडून धमकी दिली जाते. मात्र आता थेट त्यांच्या बंगल्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
अशातच दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता होती अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः केलं होतं.
(हेही वाचा – Nitin Gadkari : वाहतुकीची समस्या कमी करण्यात रोपवे महत्त्वाची भूमिका बजावतील)
नेमका प्रकार काय ?
जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) ठाण्यातील नाद या बंगल्यात अचानक एक फोन आला. यावेळी तुमच्या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. फोन करणाऱ्याने आपले नाव सांगितले नाही. अशातच रात्री अचानक आलेल्या या फोनबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. बॉम्ब असल्याच्या निनावी फोन मुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ कॉलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्यासोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केलं.
(हेही वाचा – Pandit Bhimsen Joshi: खयाल शैली, ठुमरी आणि भजन गाण्यासाठी प्रसिद्ध !)
या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ काॅलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्या सोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केले. मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हाॅटेल… pic.twitter.com/Yp3b5OcGqK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 2, 2024
मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हॉटेल ट्रायडंटमध्ये १९ व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्यांच्या हाती लागला नाही, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community