Jitendra Awhad यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचा अवमान; सर्व स्तरातून होतोय निषेध; फौजदारी कारवाईची मागणी

हा धक्कादायक प्रकार घडताना एक कार्यकर्ता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता, तरीही आव्हाडांनी (Jitendra Awhad) त्याच्याकडे दुर्लक्ष करत अत्यंत द्वेष भावनेतून फोटो फाडून त्याचे तुकडे करून त्यांनी ते जमिनीवर टाकून दिले.

377
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील एका श्लोकाचा समावेश केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) महाडच्या चवदार तळ्याकडे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट केला. त्यावेळी त्यांनी चक्क भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला.
awhad 2

असा घडला प्रकार

हा धक्कादायक प्रकार घडताना एक कार्यकर्ता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता, तरीही आव्हाडांनी (Jitendra Awhad) त्याच्याकडे दुर्लक्ष करत अत्यंत द्वेष भावनेतून फोटो फाडून त्याचे तुकडे करून त्यांनी ते जमिनीवर टाकून दिले. हा प्रकार काही क्षणात राज्यभर पोहचला. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ताबडतोब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

फौजदारी गुन्हा दाखल करा – मनसे 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे तारतम्य नसलेले, काहीही बडबडणे, बेभान होऊन वागणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले आहे. एखाद्या वैचारिक पातळीवर प्रतिवाद असू शकतो पण म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणे ही विकृती आहे. एका जबाबदार पक्षाचा जबाबदार नेता म्हणून आव्हाड स्वतःला म्हणवून घेत असतील आणि त्यांच्याकडून महामानवाचा अवमान केला जात असेल तर त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा समाजात हा नवा पायंडा पडेल, असे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले.

आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राष्ट्रवादी कॉँग्रेस

जितेंद्र आव्हाड यांनी बेजबाबदारपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला, त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जर त्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले.

आव्हाडांना अटक करा – हिंदू महासभा

वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेली पत्रके फाडून जितेंद्र आव्हाड यांनी केवळ घटनाकारांचाच नव्हे तर देशाच्या घटनेचा आणि जनतेचा सुद्धा अपमान केला आहे. हेच कृत्य जर इतर कोणाकडून झाले असते तर सरकारने जे काही केले असते ते सर्व आव्हाड यांच्याबाबत करावे. आव्हाड मोकळे राहणे या राज्यासाठी योग्य ठरणार नाही, त्यांना तात्काळ अटक करावी, असे हिंदू महासभाचे आनंद दवे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.