सवंग लोकप्रसिद्धीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) अवमान केला. त्यामुळे हिंदू धर्मीयांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. यामुळे शरद पवार गटाची ऐन निवडणुकांच्या तोंडावर चांगलीच गोची झाली आहे. आव्हाडांच्या या अशा वृत्तीवर पक्षातूनच नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. आमदार रोहित पवार यांच्यानंतर आमदार एकनाथ खडसे यांनीही जितेंद्र आव्हाडांना सुनावले.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांना घराचा अहेर दिला आहे. ‘आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.
(हेही वाचा Shri Ram : प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांनंतर सुषमा अंधारेंविरोधातही गुन्हा दाखल )
देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून…याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!, असे रोहित पवार यांनी श्रीरामाच्या (Shri Ram) अवमान प्रकरणी म्हटले.
आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2024
काय म्हणाले एकनाथ खडसे?
जितेंद्र आव्हाड यांचे हे वक्तव्य पक्षाची भूमिका असू शकत नाही. हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. तरीही निवडणुका जवळ आल्या असताना असे वादग्रस्त वक्तव्य करायचे टाळावे, असा आपला आव्हाडांना वडीलकीच्या नात्याने सल्ला आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
अनिल देशमुख म्हणाले प्रभू श्रीरामचंद्र देशवासियांचे श्रद्धास्थान
प्रभू श्रीरामचंद्र हे तमाम देश वासियांचे श्रद्धास्थान आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेलं वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते, पक्षाचे नाही!
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 4, 2024
अनिल देशमुख यांनी ट्वीट करत, प्रभू श्रीरामचंद्र हे तमाम देश वासियांचे श्रद्धास्थान आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेलं वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते, पक्षाचे नाही!, असे म्हटले.
Join Our WhatsApp Community