राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि मुंब्राचे (Mumbra) आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘X’वर नेटकऱ्यांनी इतके ट्रोल केले की, त्यांना आपली पाकिस्तान समर्थक (in support of Pakistan) भूमिका दोन तासात बदलावी लागली.
पाकिस्तानात नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यातून महाराष्ट्राला खूप काही शिकण्यासारखे आहे. निवडणुकीच्या आधी प्रख्यात क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरूंगात टाकण्यात आले. त्यांचा पक्ष आणि पक्षचिन्ह काढून घेण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक घेण्यात आली. पण,…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 15, 2024
दोन तासात उपरती
मुंब्रा या मुस्लिमबहुल मतदार संघाचे लोकप्रतिनिधी असलेले आव्हाड यांनी गुरुवारी दुपारी दुपारी १२.३० वाजता एक पोस्ट करून पहिल्याच वाक्यात महाराष्ट्राने पाकिस्तानकडून खूप शिकण्यासारखे असल्याचे म्हटले. तर पुढे त्यांना माजी पाक पंतप्रधान इम्रान खान (former Pak prime minister Imran Khan) यांच्यावर अन्याय (injustice) झाल्याचा साक्षात्कार (realisation) झाला.
इम्रान खान वर अन्याय
आव्हाड आपल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हणतात, “पाकिस्तानात नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका (General elections) झाल्या. त्यातून महाराष्ट्राला खूप काही शिकण्यासारखे (learn) आहे. निवडणुकीच्या आधी प्रख्यात क्रिकेटपटू Cricketer) आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरूंगात टाकण्यात आले. त्यांचा पक्ष आणि पक्षचिन्ह काढून घेण्यात आले होते. पाकिस्तानात विशिष्ठ वर्गाकडून अन्याय होत असल्याची जनभावना तयार झाली आहे. त्यांनी ते मतदानातून (voting) दाखवून दिले आहे. त्यांना पुन्हा लोकशाही हवी आहे. शेवटी स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, वावरण्याचे स्वातंत्र्य महत्वाचे; त्यावर घाला घालणे जनतेला जास्त दिवस आवडत नाही. लोकशाही मूल्यांची (principles of democracy) पायमल्ली करून इम्रान खान यांच्यावर झालेल्या अन्यायाला इम्रान खान यांच्या उमेदवारांना विजयी करून उत्तर दिले आहे. पक्ष तोडून सत्ता ताब्यात घेण्याची ही पद्धत पाकिस्तानप्रमाणेच भारतातही (Bharat) रूढ झाली आहे. त्यास पाकिस्तानातील जनतेने उत्तर दिले आहे. आता देशातील आणि महाराष्ट्रातील जनताही तसेच उत्तर देईल.”
किती नीच आहोत, हे जितुउद्दिनने सिध्द केले
आपन कीती निच आहोत हे पुन्हा एकदा या जितुउद्दिन ने सिध्द केले, फक्त एका पक्षाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शी भारताची तुलना करतोय हा.
आणी याची लेंडक खानारी पील्लावळ पण तेच करते आहे.
कोणास ठाऊक आजुन कीती खालच्या थराला जाणार आहेत ही भाडखाव मनोवृत्तीची लोक.— देवDuDe (@JRTheJayRawal) February 15, 2024
या पोस्टनंतर आव्हाड यांच्यावर नेटकरी तुटून पडले. एकाने त्यांचा उल्लेख जितूद्दीन असा करत टीका केली. “आपण किती नीच आहोत हे पुन्हा एकदा या जितुउद्दिन ने सिध्द केले, फक्त एका पक्षाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तानशी भारताची तुलना करतोय हा. आणि याची ****** पील्लावळ पण तेच करते आहे. कोणास ठाऊक अजून किती खालच्या थराला जाणार आहेत, ही *** मनोवृत्तीची लोक.” तर एकाने म्हटले, “भारतावर आजून एवढी वाईट वेळ आली नाही की आम्ही पाकिस्तान कडून काहीतरी शिकावे.”
लढवा अपक्ष निवडणूक
लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल तर लोक तुम्हाला भरभरून मत देतील ,मग तुम्ही महाराष्ट्राचे पहिले अपक्ष मुख्यमंत्री आणि पवार साहेब भारताचे पहिले अपक्ष पंतप्रधान होवू शकाल. तुमचं चिन्ह व पक्ष असंही गेलंच आहे. लढवा अपक्ष निवडणूक व अजमवा इम्रान सारखी ताकद. ते ही तुरुंगाबाहेर राहून. काय?
— Girish (@Girish68187239) February 15, 2024
एका नेटकाऱ्याने तर आव्हाड यांना इम्रानचा आदर्श घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवान्याहा सल्ला दिला. “लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल तर लोक तुम्हाला भरभरून मत देतील ,मग तुम्ही महाराष्ट्राचे पहिले अपक्ष मुख्यमंत्री आणि पवार साहेब भारताचे पहिले अपक्ष पंतप्रधान होऊ शकाल. तुमचं चिन्ह व पक्ष असंही गेलंच आहे. लढवा अपक्ष निवडणूक व अजमवा इम्रान सारखी ताकद. ते ही तुरुंगाबाहेर राहून. काय?”
इम्रानवरील ‘अन्याया’चा उल्लेख टाळला
महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि पक्षचिन्ह काढून घेण्याची पद्धत शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत अवलंबिली गेली आणि पाकिस्तानने महाराष्ट्राचे अनुकरण केले. वाईट वाटते की, ज्या पाकिस्तानमध्ये लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली होती ; त्यांनीदेखील महाराष्ट्राचेच अनुकरण केले होते.…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 15, 2024
अशा एक ना अनेक प्रतिक्रियानंतर आव्हाड यांना उपरती झाली आणि त्यांनी २ वाजल्यानंतर या पोस्ट मध्ये बदल करत नवीन पोस्ट केली ज्यात त्यांनी महाराष्ट्राचे अनुकरण पाकिस्तान करतोय असा बदल करत इम्रानवरील ‘अन्याया’चा उल्लेख टाळला. “महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि पक्षचिन्ह काढून घेण्याची पद्धत शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत अवलंबिली गेली आणि पाकिस्तानने महाराष्ट्राचे अनुकरण केले. वाईट वाटते की, ज्या पाकिस्तानमध्ये लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली होती. त्यांनी देखील महाराष्ट्राचेच अनुकरण केले होते. म्हणजेच लोकशाही मूल्यांची किती पायमल्ली झाली असेल, याची कल्पना येते. पण, बघा काय होतंय; इम्रान खान यांचा पक्ष काढला, निशाणी काढली. अगदी त्याचे सर्वस्व काढून घेतले. पण, इम्रान खान यांचे १०१ उमेदवार बिना पक्षाचे अपक्ष म्हणून वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आले. पाकिस्तानसारख्या अविवेकी विचार करणाऱ्या देशातही लोकशाहीची पाळेमुळे रूजली पाहिजेत, असे तेथील तरुण वर्गाला वाटू लागले आहे. पण, महाराष्ट्राचे अनुकरण पाकिस्तान करतेय, ही दुर्दैवी बाब आहे. संत महात्म्यांचा, समाजसुधारकांचा, पुरोगामी विचारधारेचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. या प्रदेशाची अशी ओळख केली आहे की, त्याचे अनुकरण आता पाकिस्तानही करतोय. पण, पाकिस्तानच्या जनतेने जे केले, त्याच्यापेक्षा अधिक कडवट उत्तर महाराष्ट्रातील जनता देईल.
एकाने तर थेट प्रश्न करत, “पाकिस्तानात निवडणूक लढविणार आहात का? नाहीतरी मुंब्रा..” असा संताप व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community