Jitendra Awhad: मनुस्मृतीचा प्रस्ताव जितेंद्र आव्हाडांनाही खुपला; महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार

187
Jitendra Awhad: मनुस्मृतीचा प्रस्ताव जितेंद्र आव्हाडांनाही खुपला; महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार
Jitendra Awhad: मनुस्मृतीचा प्रस्ताव जितेंद्र आव्हाडांनाही खुपला; महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी यापूर्वीच मनुस्मृतीच्या (Manusmriti) शालेय अभ्यासक्रमातील समावेशाविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती. आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे आक्रमक झाले आहेत.

(हेही वाचा –IPL 2024 Final: दशकाच्या प्रतीक्षेनंतर कोलकाता नाईट रायडर्स ठरला आयपीएल विजेता)

शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती. ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत. (Jitendra Awhad)

(हेही वाचा –Vidhan Parishad Election 2024:कोकण पदवीधरमधून अभिजीत पानसेंना मिळालेली उमेदवारी मनसेची की महायुतीची?)

मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आव्हान केले आहे. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज 5000 वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Jitendra Awhad)

(हेही वाचा –Maharashtra SSC Result 2024: ऑल द बेस्ट! दहावीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु)

“जे लोक 1950 साली म्हणाले की, आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय, संविधानासाठी दो बलिदान.” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. (Jitendra Awhad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.