गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी नुकतेच ठाण्यात एका जाहीर सभेत ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी तसेच, ओबीसी समाजातील नेत्यांनी आक्षेप घेतला होता, मात्र मंगळवारी पुन्हा एकदा आपल्या मतावर ठाम राहत आव्हाडांनी मी जे बोललो ते योग्यच असल्याची भूमिका मांडली. इतिहास कोणी बदलू शकत नाही, त्यामुळे बुधवारी माझ्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे, तसेच पुण्यातून २ बस भरुन माणसे येणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्त करावा, असे ट्विट आव्हाडांनी केले होते. त्यामुळे आता पोलिसांचा फौजफाटा आव्हाडांच्या घरावर तैनात करण्यात आला आहे.
असे आहे ट्विट
सोमवारी जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले की, “उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी २ बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शनजवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा……जय भीम!”
उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा…….
जय भीम!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 4, 2022
जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. क्युआरटी टीम आणि सिटी पोलीस तैनात करण्यात आले असून, कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
( हेही वाचा :न्यायालयात आता ‘माय लॉर्ड’, ‘युअर ऑनर’ हे ऐकायला मिळणार नाही, तर…)
काय म्हणाले होते आव्हाड
मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होते. पण लढण्याच्या वेळी ओबीसी मैदानात आले नाहीत. त्यावेळी महार आणि दलित लोक लढत होते. कारण ओबीसींना लढायचेचं नसते त्यांच्यावर ब्राम्हान्य वादाचा पगडा आहे. ओबीसींना हे माहितीच नाही की, चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही येऊ दिले जात नव्हते. हे तुम्ही विसरलात, त्यामुळे ओबीसीवर माझा फारसा विश्वास नाही असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community