Jitendra Awhad यांचा मुंडेंविरोधात एकच राग; माझ्याविरोधात प्रचाराला का आला? न्याय वगैरे फक्त बनाव; ऑडिओ क्लिप व्हायरल

185

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे देखील अग्रस्थानी आहेत. देशमुख कुटुंबियांना न्याय द्या, ही मागणी मागील भूमिका नाही, तर धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत मुंब्रा येथे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात प्रचाराला आले, हा त्यामागील राग आहे, अशी स्पष्टोक्ती स्वतः आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. याविषयीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

एका कार्यकर्त्याने याविषयी जितेंद्र आव्हाड यांना दूरध्वनी केला आणि त्यावर त्याने धनंजय मुडेंच्या (Jitendra Awhad) विरोधात बोलण्यासाठी बीडमध्ये का आलात, आम्हीही वंजारी तुम्हीही वंजारी, एकाच जातीचे असताना विरोध का करता? अशी विचारणा केली. त्यावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) त्या कार्यकर्त्याला म्हणाले, धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघात माझ्याविरोधात प्रचाराला का आले, हे धनंजय मुंडे यांना विचारा, असे जितेंद्र आव्हाड या कार्यकर्त्यांसोबत बोलताना म्हणाले. या संभाषणावरून सध्या जितेंद्र आव्हाड यांचे देशमुख हत्या प्रकरणात जी धनंजय मुंडेंविरोधात भूमिका आहे, ती केवळ नावापूरती आहे, खरे तर मुंडे हे आव्हाडांच्या विरोधात प्रचाराला आले त्यामुळे त्याचा वचपा काढणे हा त्यामागील उद्देश असल्याचे दिसून आले आहे. साध्य ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

(हेही वाचा ‘थर्टी फस्ट’च्या पार्टीत व्यभिचाराला प्रोत्साहन; पुण्यातील पबकडून Condom च्या पाकिटांचे वाटप)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.