महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्यावर सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने ऐतिहासिक कार्य केले, त्या ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करण्याच्या नादात डॉ. आंबेडकर यांचा फोटो जाळला. या प्रकरणी आता अधिवक्ता विवेकानंद गुप्ता यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आव्हाड यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक कारण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा Jitendra Awhad यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचा अवमान; सर्व स्तरातून होतोय निषेध; फौजदारी कारवाईची मागणी)
काय म्हटले पत्रात ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळी अस्पृश्यतेच्या विरोध आंदोलन केले होते. त्यावेळी ज्या समाजाला अस्पृश्य समजले जात होते, त्यांना तळ्याचे पाणी पिऊ दिले जात नव्हते, ते चवदार तळे सर्व समाजासाठी डॉ. आंबेडकर यांनी खुले केले. त्यामुळे चवदार तळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दलित समाजाला अभिमान आहे. नव्हे अवघ्या भारतीयांसाठी डॉ. आंबेडकर हे वंदनीय आहेत. त्या डॉ. आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी त्याच चवदार तळ्याकडे फाडून दलित समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, असे अधिवक्ता विवेकानंद गुप्ता यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आव्हाड यांनी केलेले कृत्य हे या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरत आहे.
Atrocious act @Awhadspeaks for tearing the poster of Dr. Babasaheb Ambedkar is an offence u/s 3 (t) (v) of the Schedule d caste and Scheduled Tribe Act and my compliant @RaigadPolice
He should be arrested immediately.@DGPMaharashtra pic.twitter.com/QRZiu9wsuH— Adv.Vivekanand Gupta 🇮🇳 (@vivekanandg) May 29, 2024
असा घडला प्रकार
जितेंद्र आव्हाड हे जेव्हा डॉ. आंबेडकर यांचा फोटो फाडत होते, हा धक्कादायक प्रकार घडताना एक कार्यकर्ता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता, तरीही आव्हाडांनी (Jitendra Awhad) त्याच्याकडे दुर्लक्ष करत अत्यंत द्वेष भावनेतून फोटो फाडून त्याचे तुकडे करून त्यांनी ते जमिनीवर टाकून दिले. हा प्रकार काही क्षणात राज्यभर पोहचला. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ताबडतोब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community