ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी नुकतेच जामीनावर सुटलेले राष्ट्रवादी का्ँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. रविवारी कळवा पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार एका वर्ष महिलेने केली आहे.
त्यामुळे आव्हाड यांच्यावर वर्तक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण या प्रकरणावरुन आता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्वीट करत संबंधित महिलेने राजकारणी महत्वांकाक्षेपोटी आव्हाड यांच्यावर आरोप केल्याचे म्हटले आहे.
त्या महिलेकडे मोटिव्ह आहे
ज्या महिलेने आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, त्या महिलेकडे मोटिव्ह आहे. छट पूजेवरुन झालेल्या बाचाबाचीत संबंधित महिलेवर अनेक गुन्हा दाखल झाले असून त्या जामीनावर बाहेर आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह बोलल्या आहेत.
ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत.
— Ruta Samant (@RutaSamant) November 14, 2022
(हेही वाचाः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट)
महिलेची राजकीय महत्वाकांक्षा
अंगावर धडकणा-या व्यक्तीला बाजूला करणं हा जर गुन्हा असेल तर बाजारात,ट्रेनमध्ये,रेल्वे पुलावर गर्दीमध्ये रोज शेकडो विनयभंग होत असतील, असे ट्वीट आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे ही महिला राजकारणी महत्वाकांक्षा बाळगत असल्याचा दावाही ऋता आव्हाड यांनी केला आहे.
अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील.
— Ruta Samant (@RutaSamant) November 14, 2022
(हेही वाचाः महिलेच्या विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल)
काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही, असंही ऋता आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमधून स्पष्ट केलं आहे.
रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही.
— Ruta Samant (@RutaSamant) November 14, 2022
काय आहे प्रकरण?
रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणा-या तिस-या कळवा खाडी पुलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. या उद्धाटन समारंभात ही घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले, असा दावा संबंधित महिलेने केला आहे.
Join Our WhatsApp Community