
मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींचे निराकरण तातडीने व्हावे यादृष्टीने महसूल विभागामार्फत (Revenue Department) येत्या १ एप्रिल २०२५ पासून जिवंत सातबारा विशेष मोहिम (Jivant Satbara Mohim) राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी २४ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे दिली.
(हेही वाचा – धारावी बस डेपो शेजारी Gas Cylinder च्या ट्रकला आग, एका पाठोपाठ एक सिलिंडरचे स्फोट)
राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या “जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्यावत करुन मयत खातेदारांच्या वारसाची नोंदींचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community