विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी जाहीर माफी मागितली.
त्यांनी जारी केलेल्या माफीनाम्यात आपण केलेले वक्तव्य एका विशिष्ट संदर्भात तेही सप्टेंबर २०२४ मध्ये केले होते असे नोमानी (Sajjad Nomani) याने म्हटले आहे. काही लोकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यात आले होते. त्या संदर्भात केलेले वक्तव्य होते असे नोमानी यांनी म्हटले आहे. माझे वक्तव्य कोणत्याही समाजा विरोधात नव्हते. माझा तसा उद्देशही नव्हता. आणि कोणत्याही प्रकारचा हा फतवा नव्हता. तरीही माझ्या या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो आणि विनाशर्त माफी मागतो असे नोमानीने माफीनाम्यात म्हटले आहे.
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी महाविकास आघाडीला १७ मागण्यांचे एक निवेदन दिले होते. या मागण्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या आहेत असा दावा नोमानी यांनी केल्या होत्या. मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण द्या, २०१२ ते २०२४ दरम्यान राज्यात झालेल्या दंगलीतील मुस्लिमांविरोधातील खटले काढून घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला, आदी १७ मागण्या मुस्लिम उलेमांनी महाविकास आघाडीकडे अधिकृत पत्र देऊन केल्या होत्या. महाविकास आघाडीनेही अधिकृत पत्र देऊन या मागण्या मान्य केल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून नोमानी यांच्या विरोधात तक्रारही दाखल झाली होती.
Join Our WhatsApp Community