अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी १९ व्यक्तींना स्वातंत्र्याचे राष्ट्राध्यक्ष पदक प्रदान केले. राजकारण, क्रीडा, मनोरंजन, नागरी हक्क, LGBTQ अधिकार आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा सन्मान देण्यात आला आहे. यामध्ये भारत आणि बांगलादेशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, ते जॉर्ज सोरोस (George Soros) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावर नवीन होणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क यांनी टीका करत, हा या पुरस्काराचा विडंबन आहे, अशी खोचक टीपण्णी केली.
(हेही वाचा कुंभमेळ्याची जागा Waqf Board ची; मौलवीने ओकली गरळ)
सोरोस (George Soros) यांच्या मुलाने हे पदक स्वीकारले आहे. चार पदके मरणोत्तर देण्यात आली आहेत. यात माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन, मिशिगनचे माजी गव्हर्नर जॉर्ज डब्ल्यू. रोमनी, माजी ॲटर्नी जनरल आणि सिनेटर रॉबर्ट एफ. केनेडी, माजी संरक्षण सचिव ऍश कार्टर आणि मिसिसिपी फ्रीडम डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक आणि 1965 च्या मतदान हक्क कायद्याचे संस्थापक फॅनी लू हॅमर यांचा समावेश आहे. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला देखील या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मेस्सी हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित नव्हता. माजी बास्केटबॉल दिग्गज आणि उद्योगपती इर्विन मॅजिक जॉन्सन, अभिनेता मायकेल जे. फॉक्स, संवर्धनवादी जेन गुडॉल, व्होग मासिकाच्या दीर्घकाळ संपादक-इन-चीफ ॲना विंटूर, अमेरिकन फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचे संस्थापक जॉर्ज स्टीव्हन्स ज्युनियर, उद्योजक आणि LGBTQ कार्यकर्ते टिम गिल आणि कार्लाइल ग्रुप ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्मचे सह-संस्थापक. डेव्हिड रुबेन्स्टाईन यांचाही यात समावेश आहे. १९ जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावर फेसबुकचे मालक आणि नवीन होणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क यांनी यातील George Soros यांना पुरस्कार दिल्याबद्दल टीका केली.
Join Our WhatsApp Community