Joe Biden यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार

विद्यमान राष्ट्राध्यक्ष या नात्याने उर्वरित कार्यकाळात माझ्या कर्तव्यांना पूर्णत:न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. यासंदर्भात काही दिवसातच देशवासियांना संबोधित करेन, अशी घोषणा Joe Biden यांनी केली आहे.

142
Joe Biden यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार
Joe Biden यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार

अमेरिकेसारख्या बलशाही देशाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणे हा सर्वोच्च सन्मानाचा क्षण आहे असं बायडेन यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याची माझी इच्छा आणि तयारी होती पण देशाचं आणि डेमोक्रॅट्स पक्षाचं हित लक्षात घेऊन मी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष या नात्याने उर्वरित कार्यकाळात माझ्या कर्तव्यांना पूर्णत:न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. यासंदर्भात काही दिवसातच देशवासियांना संबोधित करेन, अशी घोषणा अमेरिकेचे (US) विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी केली.

(हेही वाचा – Shiv Sena : बाळासाहेबांची इच्छा काय अन् उद्धव ठाकरेंनी केले काय?)

या घोषणेतून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. चार महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ‘अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला आहे’, असे बायडेन यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात भक्कम

बायडेन यांनी आपल्या पत्रकात लिहिले आहे की, ‘गेल्या तीन साडेतीन वर्षात एक देश म्हणून आपण प्रगतीपथावर आहोत. सध्याच्या घडीला अमेरिकेची (America) अर्थव्यवस्था जगातली भक्कम अशी आहे. देशाची पुनर्उभारणी करण्याच्या दृष्टीने आपण ऐतिहासिक गुंतवणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी औषधांच्या किमती कमी करणं, अमेरिकेच्या नागरिकांना सर्वोत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरवणं यासाठी आपण कटिबद्ध आहोत. घातक गोष्टींचा सामना करणाऱ्या ज्येष्ठांना आपण अतिशय त्वरेने सर्वोत्तम अशी मदत पुरवली आहे. ३० वर्षात पहिल्यांदाच शस्त्र सुरक्षा कायदा पारित केला. सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच आफ्रो-अमेरिकन वंशाच्या विधिज्ज्ञांची नियुक्ती झाली. हवामान बदलाला सामोरं जाण्याकरता जगात पहिल्यांदाच अशा नियमांची तरतूद केली. अमेरिका जगाचं नेतृत्व करण्यासाठी यापेक्षा सक्षम स्थितीत कधीच नव्हता.’

‘मी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून यावं यासाठी असंख्य लोकांनी अथक प्रयत्न केले. त्या सगळ्यांप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे मी आभार मानू इच्छितो. त्यांनी मला खंबीरपणे साथ दिली. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलात आणि पाठिंबा दिलात त्यासाठी मनापासून आभार मानतो. जेव्हा आपण सगळे एकत्र असतो, तेव्हा अमेरिकेला काहीच अप्राप्य नाही असं मला वाटतं. युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिकेचे या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या देशाचे आपण नागरिक आहोत हे आपण लक्षात ठेवायला हवं’, असे बायडेन (Joe Biden) यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.