नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी पुलकुंडवार, रमेश पवारांना परतावे लागणार स्वगृही

141

यापूर्वीच्या ठाकरे सरकारच्या काळात करण्यात आलेल्या नियुक्ती आता शिंदे सरकारच्यावतीने बदलल्या जात असून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आलेल्या मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांना हटवून ज्या जागी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे रमेश पवार यांना आता पुन्हा स्वगृही परतावे लागणार आहे.

( हेही वाचा : मुंबई महापालिकेचे ‘ते’ सहआयुक्त पुन्हा येणार)

रमेश पवारांना परतावे लागणार स्वगृही

मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार यांची राज्यातील तत्कालिन ठाकरे सरकारने नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली होती. परंतु राज्यातील ठाकरे सरकार जावून शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर यापूर्वीच्या सरकारने घेतलेले निर्णय फिरवण्याचा सुरुवात केली. सनदी अधिकाऱ्यांची वर्णी लागणाऱ्या या पदावर महापालिकेच्या सहआयुक्तांची प्रतिनियुक्ती केल्याने त्या जागी सनदी अधिकाऱ्यांची वर्णी लागली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार नाशिक महापालिका आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचाल डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांना बढती देत बदली करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचे सह आयुक्त असलेले रमेश पवार यांची २२ मार्च २०२२ रोजी नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले होते. त्यानंतर नाशिक महापालिका आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली होती.

( हेही वाचा : राज्यातील ११५ नगरपरिषदा आणि ९ नगरपंचायतींसाठी नव्याने सोडत काढणार )

रमेश पवार यांनी आयुक्त सहाय्यक आयुक्त या पदावर विविध प्रशासकीय विभागांमध्ये सेवा बजावली आहे. त्यानंतर उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाल्यावर त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासमवेत आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त पदाचा पदभार समर्थपणे पेलला होता. त्यानंतर कोविड काळामध्ये आरोग्य विभागाची प्रारंभीची महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती. पवार यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आल्याने रमेश पवार यांना आता यापदाचा भार त्यांच्याकडे सोपवून मुंबई महापालिकेत परतावे लागणार आहे. सध्या पवार यांच्या सहआयुक्त(सुधार) या पदाचा भार उपायुक्त केशव उबाळे यांच्याकडे असून पवार आल्यास त्यांच्याकडील हा भार आता त्यांच्याकडे द्यावा लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.