पत्रकार हे गुलाम; अमरावतीमध्ये काँग्रेस नेते Rahul Gandhi यांची टीका; पत्रकारांमध्ये संताप

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल यांनी मीडियालच लक्ष्य केले.

46

पत्रकारांना पगार घेऊन मुलांचे शिक्षण करायचे आहे. पोटाची भूक भागवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना पगार हवा असल्याने मालकाचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत’, अशी जहरी टीका संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकारांवर केली आहे. त्यांच्या या सततच्या टीकेवरून पत्रकारांमध्ये संताप वाढू लागला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल यांनी मीडियालच लक्ष्य केले. ते म्हणाले, मागच्या वर्षभरापासून संविधान, जातनिहाय जनगणना आणि ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंती तोडणार, लोकसभेत हे करून दाखविणार असे सांगत आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी (Rahul Gandhi) आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. त्यांची मेमरी लॉस झाली आहे. त्यांच्यासमोरच हे सर्व मुद्दे मांडत असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. हे सर्व मीडियावले दाखवित नाही. हे सर्व त्यांचेच आहेत. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे सर्व माझ्याकडे पाहून हसतात. आम्ही त्यांचेच असल्याचे सांगत हसतात. तुमचे नाहीच असेही सांगतात. त्यांची चूक नाही. हे मला आवडतात. पण, त्यांना पगार घ्यायचा आहे. मुलांचे शिक्षण करायचे आहे. त्यांच्या पोटाची भूक शमवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना मालकांचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत. त्यामुळे यांच्याशी माझी लढाई नाही. हे आमचे काहीही दाखविणार नाही. २४ तास मोदी दाखविणार. मी म्हणालेले काहीही दाखविणार नाही. उलट सायंकाळी मोदी यांची मेमरी खूप मस्त आहे. एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ७० वर्षे विसरत नाहीत. त्यात पुन्हा जोडतील. लहान असताना मोदी तलावात मगरीशी लढले होते. मगरीला त्यांनी बुडविले. पण, जेव्हा हेच मोदी गंगा नदीवर जातात तेव्हा त्यांना पोहता येत असल्याचे जाणवत नाही, अशी टीकाही त्यांनी केली, अशी टीकाही केली.

(हेही वाचा PM Modi यांचे आव्हान राहुल गांधींनीही अर्धवट स्वीकारले; बाळासाहेबांना ‘Hinduhridaysamrat’ बोलण्याची हिंमत केली नाही)

राहुल गांधी (Rahul Gandhi) आपण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहात.आपण सत्ताधाऱ्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करणे अपेक्षित आहे.मात्र आपण पत्रकारांविरुद्धचा आवाज उठवत आहात, त्यांना गुलाम म्हणत आहात. वर्षानुवर्षे निष्ठेने आपली लेखणी जिझवणाऱ्या तमाम पत्रकारांचा हा जाहीर अपमान आहे. आपल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणता. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या या विधानाने कमालीचे दुखावलेले आहेत. राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची कसे बोलायचे हा तुमचा अधिकार आहे पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी घेणेदेणे नसणाऱ्या पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणे योग्य नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.