जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि उद्धटपणा, उर्मटपणा असे समीकरण आहे. न आवडलेल्या प्रश्नावर ते रागाने बोलून उत्तर टाळतात, पण सोशल मीडियामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलाखतीची एक क्लिप व्हायरल होत आहे, त्यामध्ये पत्रकाराने आव्हाडांवर बोचऱ्या प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली, त्यानंतर आव्हाड दोन्ही हात जोडून पत्रकाराला थांबण्याची विनंती करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. इंस्टाग्राममध्ये महाबिघाडी या खात्यावरून हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
(हेही वाचा Rahul Gandhi यांचे विधानसभा निवडणुकीतही ‘खटाखट खटाखट…’; लाडकी बहीण योजनेला आधी विरोध, आता उदोउदो )
‘या’ प्रश्नांनी आव्हाड झाले हैराण
- १. आता तुमचे वय अराम करण्याचे झाले, अजून किती काम करणार?
- २. शहर मे नही मुतारी और बजाने बोल रहे तुतारी
- ३. २०१९ मध्ये जे तीन आश्वासने दिली होती त्यातील एकही काम झाले नाही, असे का झाले?
- ४. ९० कोटीची संपत्ती तुमची झाली? (त्यावर आव्हाड यांनी माझ्यावर ९८ कोटी रुपयांचे कर्ज आहे असे उत्तर दिले, त्यावर पत्रकाराने ‘इतके पैसे तर तुम्ही मुंब्र्यातून जिंकल्यानंतर कमवाल, इथून तिथून तुम्हाला दलाली मिळते, असे तुमच्यावर आरोप होतात, असे म्हटले.)
- ५. जेव्हा विकासाचा मुद्दा यायचा तेव्हा तुमचे कार्यकर्ते केवळ रस्ते मोजून दाखवायचे, हे तर नगरसेवकवाले काम झाले.
- ६. नशा मुक्त मुंब्रा कधी होणार?
- ७. बस डेपो कुठे आहे?
- ८. अजून कोणकोणती कामे तुम्ही करणार आहात?
- ९. रुग्णालयाचे उदघाटन झाले कि नाही? (यावर आव्हाड यांनी झाले नाही, असे उत्तर दिले.)
- १०. तुम्ही विकासावर मते मागणार कि जातीवादावर?
- ११. कधीपर्यंत मुंब्रा बेकायदेशीर असणार? आणि कधीपर्यंत लोक घाबरून राहणार?
यानंतर जितेंद्र आव्हाडांनी अक्षरशः दोन्ही हात जोडून पत्रकाराला ‘आता बस कर ना’, अशी विनंती करताना या व्हिडिओमध्ये ते दिसत आहेत.
Join Our WhatsApp Community