राज्य विधान मंडळात मंगळवारी, २७ फेब्रुवारीला अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र
राज्यातील सर्वच घटकांना न्याय देणारा अंतरिम अर्थसंकल्प असल्याची स्तुतीसुमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या वर उधळली. यावर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो हे तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दिशेने गेले. सर्व घटकांना न्याय मिळाल्याचे आपण सांगत आहात, मात्र पत्रकारांना न्याय मिळालेला नाही, अशा शब्दांत तक्रार केली.
(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : ‘निर्दयी क्रिकेट म्हणजे नेमकं काय?’ असा प्रश्न बेन स्टोक्सने का विचारला?)
त्याबरोबर सर्वच पत्रकारांनी त्यांना समर्थन देत, मे २०२३ मध्ये देण्यात आलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत, याकडे लक्ष वेधले. तसेच अद्याप शासन निर्णय निघालेला नाही, शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दोन दिवसांत जी आर निघेल, असे सांगितले पण दोन अधिवेशने होऊनही जी आर निघालेला नाही, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले.
पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे पत्रकारांना तत्काळ न्याय देण्यासाठी जोरदार आग्रह धरला. अखेर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची घोषणा केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community