JP Nadda : मोदींच्या हमीवर जनतेचा विश्वास; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला दिल्लीत सुरुवात

राजस्थान आणि छत्तीसगडची निवडणूक जिंकली आहे, आणि आता लवकरच तेलंगना आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

204
JP Nadda : मोदींच्या हमीवर जनतेचा विश्वास; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला दिल्लीत सुरुवात

भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला (JP Nadda) आजपासून (१७ फेब्रुवारी) दिल्लीत सुरवात झाली. प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथील बैठकीत देशभरातील अकरा हजारपेक्षा जास्त पक्षाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार, महापौर आदी नेते उपस्थित आहेत.

(हेही वाचा – Atal Setu: मॅरेथॉनमुळे अटल सेतू १० तासांसाठी बंद, अत्यावश्यक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध; वाचा सविस्तर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीप प्रज्वलन करून बैठकीला केली सुरुवात –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दीप प्रज्वलन करून सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर भाजप (JP Nadda) अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते. याशिवाय, महासचिव विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजया रहाटकर, पंकजा मुंडे व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रीय कार्यकारणीला संबोधित करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की,

राजस्थान आणि छत्तीसगडची निवडणूक जिंकली आहे. आणि आता लवकरच तेलंगना आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास असल्याचेही ते यावेळी म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की मोदी देशाचे प्रमुख सेवक आहेत. ते देशाच्या कारभारात पूर्णपणे व्यस्त आहेत. परंतु असे असतानाही पक्ष वाढीकडे त्यांचे संपूर्ण लक्ष आहे आणि पक्षाच्या बाजूने उभे राहिले आहेत. पक्षाची प्रगती कशी होईल, पक्षाला पुढे कसे नेता येईल, याची चिंता पंतप्रधानांना प्रत्येक क्षणी सतावत असते, असेही नड्डा (JP Nadda) यांनी आपल्या भाषणात सांगितले.

(हेही वाचा – Manoj Jarange : मराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग अडवल्यानंतर जरांगे यांनी दिला कार्यकर्त्यांना महत्वाचा सल्ला; म्हणाले …)

निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा –

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधानांनी ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी काय—काय करता येईल यावर विचार मंथन होणे आहे. (JP Nadda)

१७ राज्यात एनडीए तर १२ राज्यात भाजपचे सरकार – जेपी नड्डा

नड्डा (JP Nadda) म्हणाले की, भाजप हा आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. २०१४ पूर्वी केवळ ५ राज्यात भाजपची सरकारे होती आणि बराच काळ आम्ही ५-६ मध्ये अडकलो होतो. २०१४ नंतर आज १७ राज्यात एनडीएची सरकारे आहेत आणि १२ राज्यात भाजपची सरकारे आहेत.

आम्ही संघर्षाचा काळ पाहिला, उपेक्षेचा काळ पाहिला: नड्डा

नड्डा (JP Nadda) म्हणाले की, भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या सात दशकांच्या इतिहासातील प्रत्येक कालखंड आपण सर्वांनी पाहिला आहे. आम्ही संघर्षाचा काळ पाहिला, उपेक्षेचा काळ पाहिला, सुरक्षा वाचवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा काळ पाहिला. आणीबाणी आपण पाहिली आहे. निवडणुकांमधला विजय-पराजयही आपण पाहिला आहे. पण आम्हाला आनंद आहे की पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेलेले दशक यशांनी भरलेले आहे.

(हेही वाचा – Mahim Sea Food Plaza : मुंबईकरांनो, आता कशाला जायचे गोवा? माहिम समुद्र किनारी चाखा, चवदार भोजनाचा मेवा !)

भाजप खासदार म्हणाले – स्वर्गासारखे वाटते

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पोहोचलेल्या भाजप खासदार रमा देवी म्हणाल्या की, ‘प्रत्येक भारतीयाचे हृदय भरले असून भारत मंडपममध्ये त्यांना स्वर्गात असल्यासारखे वाटते. आपण आपल्या आयुष्यात असे काही पाहिले नाही. आम्ही आशा करतो की हे असेच चालू राहील. राहुल गांधी कोणतीही न्याय यात्रा करत नाहीत, ते फक्त त्यांचा टी-शर्ट दाखवत आहेत. (JP Nadda)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.