जेएसडब्लू कोकणात करणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक

143

वेदांता-फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, आता जेएसडब्लू कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याबाबतची माहिती दिली.

( हेही वाचा : उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा, नारायण राणेंचा घणाघात )

पेण (रायगड) येथील जेएसडब्लू निओ एनर्जी प्रकल्पाच्या सामंजस्य करारासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. पेण येथे ९६० मे.वॅ. चा पीएसपी प्रकल्प होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जेएसडब्लूच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून थेट ४५० तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून, मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होणार आहे.

७५ हजार रोजगार देण्याचा मानस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा मानस असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करीत आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.