माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या संदर्भातील निर्णय दिला आहे. यानुसार त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात राजकीय आंदोलनाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हाबाबात ते आज, बुधवारी गिरगाव न्यायालयात हजर झाले होते. यावेळी बच्चू कडूंचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आणि न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
(हेही वाचा – औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यात १० जनावरं लम्पी आजारानं दगावली)
दरम्यान, राजकीय आंदोलनाप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कडू आज न्यायालयात हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने बच्चू कडूंचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.