BJPने केल्या निवडणूक प्रभारींच्या जंबो नियुक्त्या; महाराष्ट्रातील नेत्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी

180
BJPने केल्या निवडणूक प्रभारींच्या जंबो नियुक्त्या; महाराष्ट्रातील नेत्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी
BJPने केल्या निवडणूक प्रभारींच्या जंबो नियुक्त्या; महाराष्ट्रातील नेत्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी

लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) अनेक राज्यांत निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रातील नेत्यांच्या खांद्यावर महत्वाच्या राज्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. महासचिव विनोद तावडे, प्रकाश जावडेकर आणि डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आगामी काळात महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांमध्ये निवडणूक होणे आहे. या चार राज्यांसह विविध राज्यात भाजपाने निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची सेना पाठविली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या राज्यांमध्ये भाजपाचे (BJP) प्रदर्शन कमकुवत राहिले आहे आणि ज्या राज्यांत चांगले यश मिळाले आणि आणखी जास्त यश मिळण्याची शक्यता आहे त्या राज्यांत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणे आहे. यासाठी भाजपाने (BJP) केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नेमणूक केली होती. आता आणखी 24 नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : मातोश्रीत पुन्हा साप!)

भाजपाचे (BJP) महासचिव विनोद तावडे यांच्याकडे बिहारचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने (BJP) बिहारमध्ये चागले प्रदर्शन करीत 12 जागांवर विजय मिळविला होता. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सुध्दा केरळचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही केरळमध्ये भाजपाचे चांगले प्रदर्शन राहिले आहे आणि आता आणखी चांगले यश मिळविण्यासाठी रणनिती आखली आहे.

राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांना मणिपूरचे प्रभारी बनविण्यात आले आहे. मणिपूरमध्ये उफाळून आलेली हिंसा थाबण्याचे नाव घेत नयाही आहे. शिवाय, लोकसभतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मणिपूरच्या मुद्यावरून आक्रामक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. अशात, गोपछडे यांची नियुक्ती खूप महत्वाची झाली आहे.

(हेही वाचा – Champions Return Home : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोहित, विराटशी काय गप्पा मारल्या)

जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत निवडणुका होणार आहेत. भाजपाने राष्ट्रीय सरचिटणीस तरुन चघ यांची प्रभारी म्हणून तर आशिष सूद यांची सह-प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. राजस्थान माजी अध्यक्ष सतीश पुनिया यांना हरियाणाचे प्रभारी बनविण्यात आले आहे तर राज्यसभेचे खासदार सुरेंद्र नगर हे सह-प्रभारी म्हणून काम करतील. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने हातातील 10 पैकी पाच जागा गमाविल्या आहेत.

राज्यसभेचे खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी बनविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीती ते झारखंडचे प्रभारी होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार स्थापन झाले होते. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी आणि सहप्रभारी बनविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असतील.

(हेही वाचा – Chhatrapati Sambhaji Nagar: धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू)

ओडिशातून लोकसभेचे खासदार संबित पात्रा यांना ईशान्यकडील राज्यांचे समन्वयक आणि माजी केंद्रीय मंत्री विरुद्ध मुरलीधरन यांना सह समन्वयक म्हणून कायम ठेवले गेले आहे. केरळचे अनिल अँथनीला नागालँड आणि मेघालय यांचे प्रभारी म्हणून काम केले गेले आहे. यूपीचे माजी मंत्री श्रीकांत यांना हिमाचल प्रदेशचा प्रभार देण्यात आला आहे आणि आमदार संजय टंडन हे सह-प्रभारी आहेत.

रघुनाथ कुलकर्णी यांना अंदमान आणि निकोबारचे प्रभारी बनविण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून आसामचे आमदार अशोक सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे आमदार नितीन नाबिन यांना छत्तीसगडचे प्रभारी असतील. सरचिटणीस राधा मोहन दास अग्रवाल आणि खासदार सुधकर रेड्डी कर्नाटकचे प्रभारी असतील. विजय पाल टॉमर आणि लता युंदी ओडिशाचे प्रभारी आणि सहप्रभारी असतील. निर्मल कुमार सुराना यांना पुडुचेरीचे प्रभारी राहतील. सरचिटणीस दुश्यंत कुमार गौतम आणि रेखा वर्मा उत्तराखंडचे प्रभारी आणि सहप्रभारी असतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.