-
खास प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात नैतिकतेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, तसा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नैतिकता म्हणून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आमदारकीचा राजीनामा देणार का ? असा प्रश्न शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत केला.
ठाकरे सरकारच्या भूमिकेची चौकशी
गायकवाड यांनी बुधवारी, २६ मार्च २०२५ या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याला भाजपा आमदारांनी पाठिंबा दिला. भाजपाचे आमदार राम कदम म्हणाले, दिशा सालियन प्रकरणात अजूनही ‘एसआयटी’ चौकशी सुरू आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारची भूमिका काय आहे, यावर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली. (Aaditya Thackeray)
चौकशी का करू दिली नाही
कदम पुढे म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारचे पोलीस मुंबईत आल्यानंतर त्यांना कोणी अडवले? सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर ठाकरे सरकारने त्याच फ्लॅटला रंगरंगोटी करून मूळ मालकाला परत केला होता, तेव्हा पहिल्या दिवसापासून हे प्रकरण चौकशीसाठी त्यांनी ‘सीबीआय’ला का दिले नाही? बिहार पोलिसांना चौकशी का करू दिली नाही? असा आरोप राम कदम यांनी केला (Aaditya Thackeray)
सत्य समोर येईल
मंत्री शंभुराज देसाई यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, दिशा सालियानच्या वडिलांनी स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव घेतले. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी पोलिसांना अधिकची माहिती दिली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. ज्यांच्यावर आक्षेप आहे, त्याविषयी पोलीस आयुक्तांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Sushma Andhare यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल)
अज्ञांनी लोकांनी बोलू नये
शिवसेना उबाठाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणी वारंवार उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याने त्यांची बदनामी करण्यात येत आहे, त्यामुळे ते कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी केली. त्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले की, ‘सीबीआय’ने सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अहवाल दिला आहे तो अद्याप न्यायालयाने स्वीकारलेला नाही. देहली येथील आरुषी तलवार हत्या खटल्यातही असेच झाले होते. न्यायालयाने तो अहवाल नाकारला. पुढे खटल्यात आरोपींना शिक्षा झाली. अज्ञानी लोकांनी बोलू नये, असा टोला मंत्री राणे यांनी हाणला. (Aaditya Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community