विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha Constituency) भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. पंकजा मुंडे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत.
(हेही वाचा – भारतीय बायोकेमिस्ट आणि बायो टेक्नॉलॉजिस्ट Govindarajan Padmanabhan)
मराठा आरक्षणासाठी सहानुभूती मिळवणार ?
बीड जिल्ह्यात गेले काही महिने मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात शरद पवार मराठा आरक्षणासाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील. मराठा आरक्षणाबाबत नेहमी आग्रही राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
महिला उमेदवारला मिळणार प्राधान्य ?
सध्या अजित पवारांसोबत असलेल्या बजरंग सोनवणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र बजरंग सोनवणे यांच्या ऐवजी शरद पवारांकडून ज्योती मेटेंना झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून पंकजा मुंडे उभ्या रहाणार असल्याने त्यांच्या विरोधात महिला उमेदवार देण्याला पसंती मिळू शकते.
मराठा आरक्षणाविषयी बीडमध्ये निर्माण झालेले संवेदनशील वातावरण मते खेचणार कि अजित पवारांसोबत भाजपसोबत गेलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची राजकीय ताकद काम करणार, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community