Lok Sabha Election 2024 : पंकजा मुंडेंच्या विरोधात ज्योती मेटेंना उमेदवारी; काय आहे रणनीती?

मराठा आरक्षणाच्या धगधगत्या प्रश्नामुळे सर्वात जास्त प्रभावित असलेला बीड जिल्हा. त्यामुळे या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसू शकतो असे जाणकारांचे मत आहे.

267
Lok Sabha Election 2024 : पंकजा मुंडेंच्या विरोधात ज्योती मेटेंना उमेदवारी; काय आहे रणनीती?

बीडमधलं राजकारण कायम मुंडे नावाभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळालं आहे. २०१९ मध्ये तर मुंडे विरुद्ध मुंडे असा प्रचंड संघर्ष होता. बीड लोकसभा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी या एकापाठोपाठ आश्चर्याचे धक्के देणाऱ्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर असलेली सगळीच समीकरणं आता बदलली आहेत. त्यातच वरवर भाजपासाठी त्यातल्या त्यात पंकजा मुंडेंसाठी सोपा वाटणारा हा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणामुळे बऱ्यापैकी गाजणार असेच चित्र समोर येत आहे. (Lok Sabha Election 2024)

पंकजा मुंडेंसाठी असलेल्या जमेच्या बाजू

२००४ पासून हा मतदारसंघ सतत भाजपाच्या पाठीशी उभा राहिलेला मतदार संघ असून या मतदारसंघावर ती भाजपाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव दिसून आला आहे. यामुळेच २००९ तसेच २०१४ ला देखील गोपीनाथ मुंडे यांनी या ठिकाणी एक हाती विजय प्राप्त केला होता. २०१४ ला गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची दुसरी कन्या प्रीतम मुंडे यांनी विजयाची परंपरा कायम ठेवत २०१९ ला देखील विजय प्राप्त केला. (Lok Sabha Election 2024)

बीडमधील सर्वात प्रलंबित आणि सर्वात चर्चित मुद्दा म्हणजे रेल्वे. बीडमध्ये रेल्वे कधी येणार हा प्रश्न बीडचा जवळपास प्रत्येक नागरिक विचारत असल्याचं पाहायला मिळतो. रेल्वेनं जिल्ह्याचे बहुतांश प्रश्न मार्गी लागू शकतात. त्यातच आष्टीपर्यंत रेल्वे मार्ग झाल्यामुळे बीड मधील जनतेमध्ये हा मार्ग पुढे लवकरच येईल अशी आशा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा मोठा प्रश्न पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन करून मार्गी लावला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील ३० जणांवर ‘मोक्का’)

ज्योती मेटेंना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या जमेच्या बाजू काय आहेत…

पंकजा मुंडे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार आहे. येत्या २२ मार्चला शिव संग्राम पक्षाचे स्वर्गीय नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळू शकते. बीड जिल्ह्यातील लोकसभा ही नेहमीच जातीच्या समीकरणांवर लढवली जाते. या ठिकाणी वंजारी विरुद्ध मराठा असा उमेदवार सतत दिला जातो. मागील निवडणुकांप्रमाणे यंदाची निवडणूक ही तितकीशी सोपी नाही. याचे कारण देखील काहीसे तसेच आहे. मराठा आरक्षणाच्या धगधगत्या प्रश्नामुळे सर्वात जास्त प्रभावित असलेला बीड जिल्हा. त्यामुळे या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसू शकतो असे जाणकारांचे मत आहे. त्यातल्या त्यात विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी संपूर्ण हयात घालवलेली असून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील त्यांचेच कार्यकर्ते असल्यामुळे याचा फायदा ज्योती मेटे यांना होऊ शकतो. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दुसरा क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला चार ते साडेचार लाख मतदान नेहमीच पडले आहे. त्यातच यंदाच्या मराठा मुद्द्यामुळे जर एक गठ्ठा मतदान ज्योती मेटे यांना मिळाल्यास भाजपाच्या फायर ब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी नसणार असे राजकीय भाषकारांचे म्हणणे आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.