कर्नाटकामध्ये शनिवारी, २० मे रोजी नव्या सरकारची स्थापना झाली. कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशातील विरोधी पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते. पण याला ठाकरे गटाचे कोणतेच नेते उपस्थित नव्हते. यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
ज्योती वाघमारे नक्की काय म्हणाल्या?
‘कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी झाला. देशातल्या झाडून सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण होत. परंतु काँग्रेसच्या सत्ता प्राप्तीचा आनंद, आपल्यालाच पुत्र जन्माला आला, अशापद्धतीने पेढे वाढून साजरा करणारे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नादाला लागून स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारुन घेणारे, उद्ध्वस्त ठाकरे आणि ओसाड नगरीचे राजकुमार, आदित्य ठाकरे किंवा स्वयं घोषित विश्वप्रवक्ते सकाळी साडे नऊला वाजणारा भोंगा संजय राऊत यांना मात्र त्या शपथविधीचं अजिबात निमंत्रण नव्हतं. डी राजांच्यापासून ते नितेश कुमारांपर्यंत अगदी छोट्या छोट्या विरोधी पक्षनेत्यांनाही सन्मान बोलावलं जात. पण उबाठा सेनेच्या नेत्यांना अजिबात निमंत्रण नाही, याच्यावरून यांना काँग्रेस किती कस्पटा सारखी किंमत देतो हे यांनी ओळखून घ्यावं,’ असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
पुढे वाघमारे म्हणाल्या की, ‘कर्नाटकात सत्ता मिळाली काँग्रेसला, परंतु त्या सत्ताप्राप्तीचा आनंद यांनी पेठे वाढून साजरा केला. भारत जोडो यात्रेमध्ये ओसाड नगरीचे राजकुमार आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत फिरले. राहुल गांधींचा तुम्ही प्रचार करताय. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात विजय मिळवू म्हणताय. पण उद्ध्वस्तजी ठाकरे लक्षात ठेवा, याच लोकांच्या नादाला लागून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे सत्तेला तुच्छ मानायचे, पण तुम्ही मात्र मुख्यमंत्री पदाच्या मोहामध्ये हिंदुत्व सोडलंत आणि आज तुम्हाला हेच लोकं काडीची किंमत देत नाही. गाढव पण गेलं आणि ब्रम्हचर्य पण गेलं, अशी तुमची अवस्था झाली आहे. तुम्हाला काय वाटलं होत, भले आपण काँग्रेसचं खूप कौतुक केलं, तर काँग्रेसचे लोकं सिद्धरामय्या पेक्षा मोठी खुर्ची देऊन आपल्याला शप्पथविधीला बोलावतील, असा तुमचा भ्रम होता का? अहो ज्या माणसाला स्वतः घर सांभाळता आलं नाही, ज्याला जीवाला जीव देणारे तुमच्यासाठी प्राण पणाला लावणारे ४० आमदार, सहकारी तुम्हाला सोडून जातात. आज उद्ध्वस्त ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुमची अवस्था ही घरात नाही दाणा, पण मला हवालदार म्हणा, अशी झालेली आहे.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community