Jyoti Waghmare यांनी केले उध्दव ठाकरेंचे नामकरण, म्हणाल्या, उध्दव…!

281
Jyoti Waghmare यांनी केले उध्दव ठाकरेंचे नामकरण, म्हणाल्या, उध्दव…!
Jyoti Waghmare यांनी केले उध्दव ठाकरेंचे नामकरण, म्हणाल्या, उध्दव…!
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दिल्लीत सोनियांच्य भेटीसाठी फिरत आहे, कधी सिल्वर ओकवर भेटी देत असल्याने शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती वाघमोर (Jyoti Waghmare) यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. याचे दार, त्याचे दार आणि बाई आमच्या तोंडात मार, अशी अवस्था उध्दव ठाकरेंची झाल्याचे सांगतानाच मला नाही अब्रु, मी कशाला घाबरु उक्तीनुसार दिल्ली आणि सिल्व्हर ओकवर सतत वाकून वाकून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आता उध्दव वाकरे झाल्याचा नामोल्लेख करत वाघमारे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

आझाद मैदानातील दसरा मेळाव्यात संबोधित करताना शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी महाविकास आघाडीत सर्वांनाच मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यामुळे कौन बनेगा करोडपती सारखेच आता कौन बनेगा मुख्यमंत्री आघाडीत पहायला मिळत आहे.

(हेही वाचा – Mumbai Police : मुंबईत १५ पोलीस उपायुक्तपदी मुंबईबाहेरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या)

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांचा कार्टा केला होता, याचा समाचार घेताना तीन वेळा खासदार बनलेल्या खासदाराचा उल्लेख जर उध्दव ठाकरे कार्टा असे बोलत असेल तर मग त्याच्या पोराला कार्टुन बोलायचे का असा सवाल त्यांनी केला.

आपल्या या कार्टुनला नाईट लाईफ हवे, त्यांच्या या कार्टुनने मेट्रोचे नुकसान केले आहे, तुमच्या या कार्टुनने पेग्विन आणले. त्यामुळे सोनिय गांधीसमोर वाकून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) वाकरे झाले. त्यामुळे नाचरे मोरा, उध्दवच्या पोरा असा उल्लेख करत उध्दव वाकरे हे लाचारीशिवाय काहीच करू शकत नाही,असे सांगितले.

(हेही वाचा – BMC K North Ward Office : महापालिकेच्या के उत्तर विभाग कार्यालयाचे लोकार्पण, प्रशासकीय कार्यालयांची संख्या आता झाली २६)

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनमुळे बहिणींना औषधांचे पैसे, तसेच कुणाला आठवर्षांपासून खरेदी न करता आलेली साडी घेता आली, त्यामुळे या लाडक्या बहिण योजनेमुळे पोटशुळ उठला आहे. यावेळी त्यांनी, पनवती ताई म्हणतात ही बहिणींना दिलेली लाच आहे. त्यांना हे सांगताना लाज कशी वाटत नाही. प्रणिती शिंदे, सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या करोडो रुपयांच्या घरांत राहतात, गाड्या वापरात, साड्या नेसातात. त्यमुळे आतापर्यंत बापांनी मुलींसाठी तर नवऱ्याची लाडकी बायको होती, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहिण योजना आणली. ही योजना ही आणली म्हणून त्यांच्या पोटात दुखत असून अशा सावत्र बहिणींना जागा दाखवण्याची गरज आहे आणि ही जागा दाखवल्याशिवाय या बहिणी राहणार नाही.

मुलगी शिकली, पण तिला दीड हजार रुपये देवून घरी बसवले असा आरोप उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला, याचा समाचार घेताना वाघमारे यांनी आपण घरी बसलात, आमच्या लाडक्या बहिणींनी आपल्याला कायमच घरी बसवले असल्याचे सांगितले. योवळी संजय राऊत यांचा उल्लेख भांडूपचा भामट्या असा करत वाघमारे यांनी ते कोणत्या नशेत असतात,असे सांगत महाविकास आघाडीत एवढी अब्रु निघूनही ते काहीही बोलत असल्याने संजय राऊत म्हणजे बडे बडे बाता, वडापाव खाता अशीच त्यांनी स्थिती असल्याचा जोरदार टिका केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.