पुण्यात भाजपाच्या संविधान गौरव अभियान कार्यक्रमात केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या इंडीयन स्टेट विरोधात आमची लढाई या विधानावर सिंधिया यांनी प्रखर प्रतिक्रिया दिली आहे.
( हेही वाचा : देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई; Devendra Fadnavis यांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर)
सिंधिया म्हणाले की, देशाविरुद्ध केवळ दहशतवादी आणि नक्षलवादी लढतात. पण आज विरोधी पक्षाचे नेतेच स्वत: सांगत आहेत की, ते कोणाच्या विरोधात लढत आहेत. त्यांनी काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप करताना सांगितले की, गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने १०६ वेळा संविधान दुरूस्ती केली असून त्यापैकी ७० टक्के बदल काँग्रेसच्या काळात आहे. (Congress)
तसेच सिंधिया पुढे म्हणाले की, कॉँग्रेसच्या संविधान विरोधी काळाचा अस्त झाला असून भाजपाचा संविधान गौरव काल सुरू झाला आहे. भारताचे हे सर्वश्रेष्ठ संविधान युगानुयुगे जनतेला प्रेरणा आणि संरक्षण देत राहील. येत्या काळात भारत विश्वगुरु होण्यासोबतच जगातली तिसरी महासत्ता बनणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर नेतृत्व करत आहेत. भारताचे संविधान गौरव अभियान जनतेला प्रेरक ठरेल, संविधान गौरव अभियानाने जनतेचा आत्मविश्वास वाढणार असा आत्मविश्वास आज केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी आज येथे व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘संविधान गौरव अभियान’ च्या पुण्यातील सभेत ते बोलत होते.
दरम्यान ज्यांनी संविधानाची निर्मिती केली त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या विरोधी काम त्यावेळी कॉँग्रेस पक्षाने केले. संविधानामध्ये अनेकवेळा घटना दुरुस्त्या करून केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचे काम कॉँग्रेसी नेत्यानी केले. कॉँग्रेससरकार नसलेल्या राज्यात आणीबाणी लागू करून ती सरकारे बरखास्त करण्याचे काम केले. याउलट भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मागील दहा वर्षात बाबासाहेब यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले. संसदेत तैलचित्र लावण्याचे काम भाजपाने केले. त्यांच्या निवासस्थानांचे रूपांतर स्मरकात करण्यासाठी त्यांच्या पांच ठिकाणी स्मारके उभे केली. यामुळे संविधान निर्माते आणि संविधानाचा विशेष गौरव झाला आहे, असे ज्योतिरादित्य सिंधीया यांनी अधोरेखित केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community