K. Chandrashekar Rao : के चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्रातील आगमनाचा भाजपाला होणार फायदा

मागील २०१४,२०१९ प्रमाणे जर एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी प्रमाणे जर भारत राष्ट्र समितीने (K. Chandrashekar Rao) महाराष्ट्रात एकटी निवडणूक लढवली तर किमान मराठवाड्यात महाविकास आघाडी पक्षाला याचा फटका बसेल आणि भाजप पक्षाला याचा फायदा होऊ होईल.

169
K. Chandrashekar Rao
K. Chandrashekar Rao : के चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्रातील आगमनाचा भाजपाला होणार फायदा

“अबकी बार, किसान सरकार” घोषणा देत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती (BRS) चे पाळमुळे महाराष्ट्रात वाढवण्यास सुरुवात केली आहे. तेलंगानाच्या शेजारील महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा येथून त्यांनी प्रवेश केला आहे. चंद्रशेखर राव यांनी मार्च महिन्यात नांदेड आणि नंतर आता औंगाबादमध्ये देखील सभा घेऊन पक्ष विस्तारास सुरुवात करत लोकसभा आणि विधानसभा लडवणार असल्याचं देखील बोलून दाखवले आहे. यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत आता मतांमध्ये वाटेकरी झाल्याने याचा फायदा भाजपाला होऊ शकतो.

(हेही वाचा – शिंदे, फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर; वरिष्ठ नेत्यांना भेटणार)

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात एकटी निवडणूक लढल्यास त्याचा सध्या तरी मराठवाड्यात मोठा फरक पडू शकतो. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची विकासाची प्रतिमा त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. मराठवाड्यातील काही विधानसभा क्षेत्रात त्यांचा नक्कीच प्रभाव असल्यामुळे सभेला मोठी गर्दी देखील झाल्याचे दिसून आले होते. याबरोबरच महाराष्ट्रातील काही माजी आमदार आणि विविध पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी देखील त्यांच्या सभेत उपस्थित राहून पक्षात प्रवेश देखील केला आहे.

हेही पहा – 

मागील २०१४,२०१९ प्रमाणे जर एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी प्रमाणे जर भारत राष्ट्र समितीने (K. Chandrashekar Rao) महाराष्ट्रात एकटी निवडणूक लढवली तर किमान मराठवाड्यात महाविकास आघाडी पक्षाला याचा फटका बसेल आणि भाजप पक्षाला याचा फायदा होऊ होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.