दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना सोमवारी (दि.३ जून) दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडी ३ जुलैपर्यंत वाढ केली, अशी माहिती एएनआयने प्रसिद्ध केली आहे. (K Kavita )
ईडीसोबत, सीबीआयदेखील मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. २१ मे रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने कविता यांच्या कोठडीत ३ जूनपर्यंत वाढ केली होती. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी, (३ जून) रोजी संपत होती. के. कविता यांना सोमवारी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडी ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. के. कविता यांना १५ मार्च रोजी ईडीने, तर सीबीआयने ११ एप्रिल रोजी मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक केली होती. दरम्यान त्या सध्या ईडी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत. (K Kavita)
(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : पुण्याच्या पोर्स अपघातानंतर मुंबई पोलिसांकडून बार, पबबाहेर पडणाऱ्यांची तपासणी)
के. कविता यांच्यावरील आरोप?
के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की ‘साउथ ग्रुप’ नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत ‘आप’ नेत्यांना १०० कोटी रुपयांची लाच दिली होती. आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या या प्रकरणात तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वीच आप नेते खासदार संजय सिंह यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community