लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरद्वारे हिंदूंचा श्रद्धास्थानी असलेल्या काली मातेचे विडंबन केले. या पोस्टरमध्ये, देवी काली सिगारेट ओढताना आणि एलजीबीटी समुदायाचा झेंडा उंचावताना दिसत असताना दाखवल्यामुळे वाद उफाळून आला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खुद्द केंद्र सरकारही कारवाई करणार आहे. त्यानंतर ट्विटरने लीनाचे वादग्रस्त पोस्टर असलेले ट्विट आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. दरम्यान हे वादग्रस्त पोस्टर रिलीज कसे झाले? टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणारे पोस्टर्स, चित्रपटाचे ट्रेलर यावर भारतातील सेन्सॉर बोर्डाचे नियंत्रण नाही का?, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
काली चित्रपटाच्या पोस्टरसाठी परवानगी घेतली नव्हती – अशोक पंडित
याबाबत ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’चे सेन्सॉरचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी आणि इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक पंडित यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. त्यावेळी अशोक पंडित म्हणाले, एखादा चित्रपट थिएटरवर प्रदर्शित होतो, तेव्हा त्याला सेन्सॉर प्रमाणपत्राची आवश्यकता असते. थिएटरमध्ये दाखवण्यात येणारे चित्रपटच नव्हे तर माहितीपट, क्रिकेट सामने यासाठीही सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी घ्यावी लागते. ‘चित्रपट महोत्सवाचे प्रकरण थोडे वेगळे असते. राष्ट्रीय पुरस्कार, ईएफआय असे चित्रपट महोत्सव जेव्हा भारतात होणार असतील, तर त्यांनाही सेन्सॉर प्रमाणपत्राची गरज असते. ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्यापूर्वी त्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडे जावे लागते. इतर देशांमध्ये खाजगी चित्रपट महोत्सव होणार असतील, तर तेथील चित्रपटांसाठी सेन्सॉर प्रमाणपत्र घ्यायचे का, हे तेथील आयोजकांवर अवलंबून असते. ‘चित्रपटांच्या पोस्टर्सना इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनची मान्यता घ्यावी लागते. आधी चित्रपटाचे पोस्टर मंजूर केले जाते आणि मग सेन्सॉर बोर्डाकडे जाते. ‘काली’ चित्रपटाचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध कारण्यापूर्वी ते पोस्टर किंवा सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी दिग्दर्शकाने आमच्याकडे अर्ज केलेला नाही. जर निर्माती केरळच्या कोणत्याही भागात पोस्टर रिलीज करत असेल तर त्यासाठी आमची परवानगी घेणे अनिवार्य होते. कोणत्याही धर्माबाबत गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असेही अशोक पंडित म्हणाले.
(हेही वाचा काली चित्रपट: आणखी किती दिवस हिंदूंनी आपल्या देवतांचा अपमान सहन करायचा आहे?)
‘काली’साठी कायद्याच्या गैरवापर – पहलाज निहलानी
तर सेन्सॉरचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी म्हणाले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जे चित्रपट जातात, त्यांना मान्यता देणे सेन्सॉरसाठी प्राधान्य असते. जेणेकरून ते त्यांच्या निर्धारित वेळेत महोत्सवात पोहचतील. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या दृष्टीकोनातून जे काही चित्रपट बनवले जातात, त्यांच्या सेन्सॉरशिपच्या पद्धती वेगळ्या असतात. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी असल्याने त्याला तेथील मानकांशी जुळण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. आम्ही तिथल्या मार्गदर्शक तत्त्वांकडेही लक्ष देतो. त्यामुळेही अनेक गोष्टी समोर येतात. सहसा असे सामान्य बॉलीवूड चित्रपटांमध्ये होत नाही. याचा गैरफायदाही अनेक चित्रपट निर्माते घेतात. महोत्सवाचे नाव घेऊन ते चित्रपट सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळवून व्यावसायिक नफा कमावतात. ‘जेव्हा मी सेन्सॉर बोर्डात आलो तेव्हा या प्रथेला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. शाहरुख खानच्या माया मेम साहबचा पूर्ण न्यूड शॉट होता, त्याला लगाम लावला होता, ‘या गोष्टी घडायला नको होत्या. धर्म आणि श्रद्धेशी खेळणाऱ्यांना त्रास सहन करावा लागेल. सिगारेट ओढणारा देव दाखवला तर देव देवतांवर कुणाची श्रद्धा राहणार?, असे निहलानी म्हणाले.
Join Our WhatsApp Community