काबूल विमानतळावर तालिबान्यांचा दहशतवादी हल्ला! अजून हल्ले होण्याची भीती 

१३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३० हुन अधिक नागरिक जखमी झाले.

काबूल विमानतळावरील नागरिकांना सुखरूपपणे त्या त्या देशात जाऊ द्यावे, यावर अमेरिका आणि तालिबानी यांच्यामध्ये सहमती झाली असतानाही गुरुवारी, २६ ऑगस्ट रोजी मात्र तालिबान्यांनी त्याला फटा देत काबूल विमानतळावर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून दहशतवादी हल्ला केला. त्यामध्ये १३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३० हुन अधिक नागरिक जखमी झाले. तालिबान असेच आणखी हल्ले करेल, असा इशारा अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांनी दिला आहे.

५२ जणांचा मृत्यू झाल्याचा तालिबानचा दावा!

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर ११ दिवसांत अमेरिकेने आटपार्यंत ८८ हजार अफगाण नागरिकांना देशातून बाहेर काढले. प्रत्येक ३९ मिनिटानंतर एक विमानाचे उड्डाण होत आहे. हजारो नागरिक आजही काबूलमध्ये अडकून पडले आहेत. अजूनही अमेरिकेचा पासपोर्ट असलेले १५०० नागरिक अजूनही काबूल विमानतळावर अडकलेले आहेत. जरी काबुल विमानतळ बंद केले तरी कंदाहार विमानतळ पुन्हा सुरु करून विमानांची ये-जा करता येऊ शकते. दरम्यान वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या मतानुसार अफगाणिस्तानात १४ लाख नागरिक उपासमारीला सामोरे जात आहेत. दरम्यान तालिबानचा प्रवक्ता झाबिहुल्ला मुजाहिद यांनी २ बॉम्बस्फोटात ५२ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे, मात्र मृतांचा अधिकृत आकडा मिळू शकला नाही.

(हेही वाचा : युवा सेनेचे ‘ते’ आंदोलन शिवसैनिकांच्या जिव्हारी!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here