Kalyan Banerjee : कल्याण बॅनर्जींनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल; दिले ‘हे’ कारण

खासदार Kalyan Banerjee यांनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. 'मला माझे मत मांडण्याचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. तुम्ही मला मारू शकता; पण मी मागे हटणार नाही', असे उद्दाम स्पष्टीकरण खासदार कल्याण बॅनर्जी यांनी दिले आहे.

241
Kalyan Banerjee : कल्याण बॅनर्जींनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल; दिले 'हे' कारण
Kalyan Banerjee : कल्याण बॅनर्जींनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल; दिले 'हे' कारण

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhad) यांची नक्कल केली आहे. कल्याण बॅनर्जी यांनी रविवार, 25 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका सभेत आपल्या भाषणात उपराष्ट्रपतींची पुन्हा खिल्ली उडवली.

(हेही वाचा – Fog safety Device : धुक्यातही रेल्वे गाड्या धावणार सुसाट; रेल्वे कडून नवीन उपाय योजना)

मिमिक्री ही एक कला आहे – बॅनर्जी यांचे स्पष्टीकरण

याविषयी विचारले असता बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी स्वतःच्या कृतीचे समर्थन केले आहे. बॅनर्जी म्हणाले की, ”मी मिमिक्री (Mimicry) करत रहाणार, ही एक कला आहे. आवश्यक असल्यास, मी हे हजार वेळा करेन. मला माझे मत मांडण्याचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. तुम्ही मला मारू शकता; पण मी मागे हटणार नाही, मी लढत राहीन.”

पश्चिम बंगालमधील (West Bengal) सभेला संबोधित करतांना बॅनर्जी (Kalyan Banerjee) पुढे म्हणाले, ”कोणालाही दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही. तथापि मला एक प्रश्न आहे. ते (जगदीप धनखड) खरेच राज्यसभेत (Rajya Sabha) असे वागतात का ? मिमिक्री ही एक कला आहे. 2014 ते 2019 दरम्यान पंतप्रधानांनी लोकसभेतही ती केली होती.”

(हेही वाचा – India’s Favourite Food : स्विगी ॲपवर एका सेकंदाला बिर्याणीच्या २.५ ऑर्डर)

घटनात्मक पदावर असूनही मला सोडत नाहीत – धनखड यांनी मांडली व्यथा

उपराष्ट्रपतींनीही (Vice President Jagdeep Dhankhad) रविवारी मिमिक्रीबाबत आपली व्यथा मांडली. ते निवासस्थानी भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) प्रोबेशनर्सच्या तुकडीला संबोधित करत होते. यादरम्यान धनखड म्हणाले की, ”फक्त पीडित व्यक्तीलाच माहिती असते की, त्याला काय सहन करावे लागते. त्याला सर्वांकडून अपमान सहन करावा लागतो. तरीही आपल्याला त्याच दिशेने वाटचाल करायची आहे, जो मार्ग भारतमातेच्या सेवेकडे घेऊन जातो. मी घटनात्मक पदावर असूनही लोक मला सोडत नाहीत. (Kalyan Banerjee)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.