हिवाळी अधिवेशनात निलंबित झालेले १४१ खासदार संसद परिसरता आंदोलन करत होते. यावेळी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee Mimicry) यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. यावरून उपराष्ट्रपती संताप व्यक्त केला आहे.
उपराष्ट्रपतींनी या प्रकाराला लज्जास्पद म्हटलं आहे. हा सर्व प्रकार अस्वीकार्य आहे. एक खासदार खिल्ली उडवत आहेत आणि दुसरा खासदार व्हिडियो बनवत आहे,
If the country was wondering why Opposition MPs were suspended, here is the reason…
TMC MP Kalyan Banerjee mocked the Honourable Vice President, while Rahul Gandhi lustily cheered him on. One can imagine how reckless and violative they have been of the House! pic.twitter.com/5o6VTTyF9C
— BJP (@BJP4India) December 19, 2023
याविषयी राज्यसभा अध्यक्ष म्हणाले की, पातळी सोडण्याची काही मर्यादा असते. मी एक व्हिडियो पाहिला. त्यात एक खासदार माझी नक्कल करत आहेत. दुसरा त्याचा व्हिडियो करत आहेत. त्यांना सद्बुद्धी मिळो.
हा केवळ शेतकरी आणि समाजाचा अपमान नाही, तर राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा अपमान आहे. आणि तेही इतक्या दीर्घकाळ राज्य केलेल्या राजकीय पक्षाच्या सदस्याने. एका खासदाराने आज संसदेत उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवण्याच्या घटनेवर संताप व्यक्त करताना धनखड म्हणाले, “आज आपल्याला सर्वात खालची पातळी पाहण्याची संधी मिळाली. त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या काँग्रेस खासदार चिदंबरम यांना विचारले की, “संसदेच्या एका वरिष्ठ सदस्याने दुसऱ्या सदस्याचा व्हिडिओ काढला… कशासाठी? मी तुम्हाला सांगतो की मला खूप वेदना होत आहेत.”
राज्यसभेतील कामकाजादरम्यान जगदीप धनखडी यांनी केलेल्या कृतीची नक्कल कल्याण बॅनर्जी यांनी करून दाखवली. यावेळी त्यांच्या शेजारी अनेक खासदार उपस्थित होते. राहुल गांधीदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. कल्याण बॅनर्जी यांच्या कृतीला इतर खासदार दाद देत असल्याचंही या व्हिडियोमध्ये दिसत आहे.
कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. कल्याण बॅनर्जी यांनी संसदेची प्रतिष्ठा आणि पदाचा अपमान केलाय, असे ते म्हणाले.
‘हा’ लाजिरवाणा प्रकार…
या घटनेचे गांभीर्य व्यक्त करताना उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, “चिदंबरम, तुमच्या पक्षाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता. जो नंतर काढून टाकण्यात आला, तो लाजिरवाणा आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याच्या ट्विटर हँडलचा वापर माझा अपमान करण्यासाठी केला.”
हेही पहा –