लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक जागांवरील उमेदवार निश्चित झाले असले, तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Election) कोणामध्ये लढत होणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. खासदार श्रीकांत शिंदे सध्या विद्यमान खासदार आहेत. तेथे महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, हेही अजून घोषित करण्यात आलेले नाही. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे मुख्यमंत्रीपुत्र असल्याने श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरले जात आहे.
(हेही वाचा – IPL 2024, Mayank Yadav : १५५.८ किमी प्रतीतास वेगाने चेंडू फेकणारा मयंक इतके दिवस कुठे होता, सगळीकडे चर्चा?)
उबाठा गटाकडूनही अद्याप स्पष्टीकरण नाही
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडूनही उमेदवार निश्चित झालेला नाही. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उबाठा गट मोठा चेहरा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच उबाठा गटाच्या नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Poul) यांनी कल्याणमधून उमेदवारी मिळाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र १ एप्रिल रोजी ही पोस्ट व्हायरल होत असल्याने यावर एप्रिल फुल अशा कमेंटही आल्या आहेत. उबाठा गटाकडूनही अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने #मशाल चिन्हावर शिवसेनेकडून #कल्याण लोकसभा लढवत आहे..🚩💪
ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या #खासदार मुलाच्या विरोधात संधी…
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) April 1, 2024
काय आहे ट्वीट
“आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे, असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे. अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आदरणीय साहेब, आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, वरुणजी सरदेसाई, साईनाथजी दुर्गे’, असे ट्विट अयोध्या पोळ यांनी केले आहे.
कल्याण लोकसभेसाठी उबाठा गटाकडून याआधीही अनेक नावे चर्चेत आली आहेत. सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुभाष भोईर, केदार दिघे यांच्या नावांचीही बरीच चर्चा झाली होती. आता अयोध्या पोळ यांचेही नाव समोर आले आहे. (Kalyan Lok Sabha Election)
हेही पहा
Join Our WhatsApp Community