Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभेवरून अजूनही धुसफूस सुरु; भाजप कार्यकर्त्यांनी केली नवी मागणी

Kalyan Lok Sabha : दिवा शहरातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एकमताने एक मुखाने हीच मागणी आहे, अशी मागणी भाजप दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी केली आहे.

228
Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभेवरून अजूनही धुसफूस सुरु; भाजप कार्यकर्त्यांनी केली मागणी
Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभेवरून अजूनही धुसफूस सुरु; भाजप कार्यकर्त्यांनी केली मागणी

लोकसभेच्या जागावाटपावरून बरीच मोर्चेबांधणी चालू आहे. अनेक जागांवरून कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक ठिकाणी नाराजीनाट्यही चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही अनिश्चितता निर्माण झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने कमळ चिन्हावरच निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपमध्ये होत आहे. (Kalyan Lok Sabha)

(हेही वाचा – Naxalite Killed : रेपनपल्लीच्या जंगलात सी-सी-60 जवानांची कारवाई; 4 नक्षलवादी ठार)

कल्याण लोकसभेची जागा महायुतीने शिवसेनेला सोडली आहे. प्रत्यक्षात अजूनही कल्याण लोकसभा ही जागा अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) कल्याण लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढवणार आहेत.

काय आहे भाजपा कार्यकर्त्यांची मागणी ?

कल्याण लोकसभा निवडणुकीचा (Kalyan Lok Sabha Constituency) जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्यांनी भाजपच्या (BJP) कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी. कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षाची ताकद पाहता, तसेच या मतदारसंघातील आमदार आणि नगरसेवकांचे संख्याबळ पाहता भारतीय जनता पार्टीच्या खासदारांसाठी पोषक वातावरण आहे. दिवा शहरातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एकमताने एक मुखाने हीच मागणी आहे, अशी मागणी भाजप दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर (Sachin Bhoir) यांच्यासह कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना केली आहे.

अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर

भारतीय जनता पार्टीने यापूर्वीही अनेक वेळा कल्याण लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या भागात दौरेही केले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत अनेकदा खटके उडाले आहेत. भाजप आणि शिवसेनेचा अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला वरिष्ठांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र पुन्हा निवडणूक जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी हे पत्र लिहिल्यामुळे पुन्हा एकदा भाजप सेनेमध्ये धुसपुस सुरू असल्याचे दिसून येत आहे. (Kalyan Lok Sabha)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.