उद्धव ठाकरेंनी वडिलांचे नाव बुडवले… कांचन गिरींची टीका

साध्वी कांचन गिरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. इतकंच नाही तर राज ठाकरेंमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा दिसते, असे सांगत कांचन गिरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मात्र चांगलाच निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंनी मुस्लिम लोकांसोबत पक्ष बनवला

उद्धव ठाकरेंबाबत मला काहीही बोलायचे नाही. त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बुडवले आहे. बाळासाहेब हे प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व होते, ते जे बोलायचे ते करुन दाखवायचे. त्यांनी कायमंच हिंदुंसाठी एखाद्या वाघाप्रमाणे डरकाळी फोडली. मात्र त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर आपण नाराज असल्याचे कांचन गिरी म्हणाल्या. उद्धव ठाकरेंनी मुस्लिम लोकांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

(हेही वाचाः आता दिवाळीचा केला ‘जश्न-ए-रिवाज’! ट्विटरवर युजर्सनी व्यक्त केला संताप)

त्यांनी आपले डोळे आणि कान बंद करुन घेतले

उद्धव ठाकरे जर हिंदुत्ववादी विचारांचे असते तर पालघरच्या साधूंच्या हत्येबाबत त्यांनी आवाज उठवला असता. पण त्यांनी तर या घटनेबाबत आपले डोळे आणि कान बंद करुन घेतले आहेत, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here