राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा आहे. आपण ३ इडियट्स चित्रपटात पाहिले असेल की, मुलांना आपल्या पालकांच्या इच्छांसाठी बळी पडावे लागते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरही असेच काहीसे झाले आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी राजकारणात सक्रिय रहाण्यासाठी आईकडून दबाव टाकला जातो. याउलट त्या दोघांना त्यांचे जीवन जगण्याची मुभा द्यायला हवी होती, अशी खोचक टीका अभिनेत्री कंगना रणौत हिने केली आहे. कंगना रणौतला (Kangana Ranaut) भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.तेव्हापासून कंगना रणौतने राहुल गांधींवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. नुकतीच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये कंगनाने राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधीला राजकारणात उतरण्यासाठी भाग पाडले गेले, अशी टीका केली आहे.
राहुल गांधी यांचे वय ५० च्याही पुढे
या मुलाखतीत कंगना रणौत पुढे म्हणाली की, राहुल गांधी यांचे वय ५० च्याही पुढे गेले आहे. तरीही त्यांना युवा नेता म्हणून वारंवार पुढे आणले जाते. मला वाटते त्यांच्यावर खूप दबाव आहे आणि ते एकटे पडलेले आहेत. गांधी कुटुंबाने त्यांच्या मुलांना इतर क्षेत्रात काम करू दिले पाहिजे होते. त्यांनी कदाचित अभिनय क्षेत्रातही काम करायला हरकत नव्हती.
ते चांगले अभिनेते झाले असते
राहुल गांधी यांनी इतर क्षेत्रात काहीतरी करायला हवे होते, त्यांनी अभिनय क्षेत्रात हातपाय मारायला हरकत नव्हती. कदाचित ते चांगले अभिनेते झाले असते. त्यांची आई जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. मी अशी अफवा ऐकली की, ते एका महिलेच्या प्रेमात होते, पण त्यांना तिच्याशी लग्न करता आले नाही, असा दावाही कंगना रणौतने केला आहे. (Kangana Ranaut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community