Kangana Ranaut : ….तरीही भाजपच्या ‘क्वीन’ने काँग्रेसच्या महाराजाला हरविले!

विक्रमादित्य सिंह यांना हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्या जागेवर भाजपाने उमेदवारी दिलेल्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विजयी झाल्या होत्या.

174
  • वंदना बर्वे

बॉलीवूड ‘क्वीन’ आणि भाजपाच्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने पूर्वश्रमीचे ‘किंग’ विक्रमादित्य सिंग यांना मैदानात उतरविले होते. कंगनाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त निधी विक्रमदित्य यांना दिला होता. परंतु तरीही भाजपाच्या ‘क्वीन’ने काँग्रेसच्या महाराजांचा पराभव केला.

काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्या उमेदवारांना खर्चासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. पक्षाने लोकसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना दोन मतदारसंघांसाठी प्रत्येकी ७० लाख रुपये दिले. इतरही काही उमेदवारांना हा निधी मिळाला. मात्र, काँग्रेसकडून खर्चासाठी मिळणा-या निधीबाबत हिमाचल प्रदेशातील विक्रमादित्य सिंह यांनी राहुल यांनाही मागे टाकले.

विक्रमादित्य यांना तब्बल 87 लाख इतका पक्षनिधी मिळाला. तर राहुल गांधी यांना रायबरेली आणि वायनाड मतदारसंघासाठी प्रत्येकी 70 लाख रुपये मिळाले. लोकसभेसोबत आंध प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या निवडणुका झाल्या. त्यासाठीच्या खर्चाशी संबंधित तपशीलाचा काही भाग काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे सादर केला. त्यामध्ये निवडणूक लढविण्यासाठी दिलेल्या निधीचा समावेश आहे.

(हेही वाचा Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवातील पावित्र्य आणि धर्मजागृतीसाठी शंभराहून अधिक गणेश मंडळ आली एकत्र)

मंडी मतदारसंघातून पराभव

विक्रमादित्य सिंह यांना हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्या जागेवर भाजपाने उमेदवारी दिलेल्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विजयी झाल्या होत्या. निवडणूक काळात चर्चेत असलेले काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनाही ७० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते.मात्र, गांधी परिवाराशी निष्ठावंत असणाऱ्या शर्मा यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठीतून भाजपाच्या हाय -प्रोफाईल नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव केला. के.सी. वेणुगोपाल, मणिकम टागोर या नेत्यांनाही पक्ष निधी मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना ५० लाख, तर आनंद शर्मा यांना ४६ लाख रुपये खर्चासाठी मिळाले. मात्र दिग्विजय आणि शर्मा या दोघांचाही पराभव झाला झाला. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.