गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंगांच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावे हे तुम्ही ठरवले पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरे तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, अशी पोस्ट सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिने केली आहे.
याआधी कंगनाने देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे वक्तव्य केल्याने वाद उफाळून आला. हा वाद शमत नाही तोच कंगनाने पुन्हा स्वातंत्र्याच्या विषयावर मतप्रदर्शन केले. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले आहेत. याद्वारे कंगनाने पुन्हा एकदा ‘भीक मागून मिळाले स्वातंत्र्य’ या विधानावर आपली भूमिका मांडली आहे.
(हेही वाचा स्वातंत्र्य भिकेत मिळालंय, कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्याचं गोखलेंकडून समर्थन! म्हणाले…)
एका गालावर थप्पड मारल्यावर दुसऱ्या गाल पुढे करून भीक मिळते!
ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही… हेच लोक आम्हाला शिकवतात…जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्या गालावर दुसरी थप्पड द्या आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते…म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असेही कंगनाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community