“स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच”; उद्धव ठाकरेंवर कंगनाचे टीकास्त्र

181

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक महत्वाचा वाद म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे होणार शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे होणार? हा विषय चर्चेत होता. अखेर १७ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच झाली आहे. राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या परंतु आता बॉलिवूडच्या क्वीनने यावर तिचे मत व्यक्त करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

( हेही वाचा : जे.जे. मधील परिचारिका शिक्षण संस्था वैद्यकीय विभागात विलीन करण्याच्या निर्णयाला विरोध; अन्यथा आंदोलनाचा इशारा )

उद्धव ठाकरेंवर निशाणा

कंगना राणौतने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “वाईट वागल्यानंतर देवांचा राजा असलेल्या इंद्राला सुद्धा शिक्षा मिळत होती, हा तर फक्त नेता आहे. ज्यावेळी त्याने माझं घर तोडलं त्यावेळी मला वाटलंच होतं याचे वाईट दिवस आता सुरू होणार आणि एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही” असे खोचक ट्वीट करत कंगनाने पुन्हा एकदा ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

याआधी सुद्धा ठाकरे सरकारच्या कालावधीत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कंगनाच्या घराचा काही भाग पाडला होता तेव्हा “आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टुटेगा” असे ट्वीट कंगनाने केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.